देवदैठण ही देवांची भूमी आहे तुम्हीं देवांच्या सहवासात राहणार आहात – धरमचंद फुलफगर सि.टी.बोरा. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवायोजनेचे विशेष हिवाळी शिबीराचे देवदैठण येथे पार पडले उद्घाटन
देवदैठण ही देवांची भूमी आहे तुम्हीं देवांच्या सहवासात राहणार आहात – धरमचंद फुलफगर
सि.टी.बोरा. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवायोजनेचे विशेष हिवाळी शिबीराचे देवदैठण येथे पार पडले उद्घाटन
श्रीगोंदा प्रतिनिधी :- अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविदयालयाचे राष्ट्रीय सेवायोजनेचे विशेष हिवाळी शिबीराचे उद्घाटन पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. धरमचंद फुलफगर (सदस्य, महाविद्यालय नियामक मंडळ ) यांनी भूषविले व उदघाटन शि. शि. प्र. मंडळाचे सचिव मा. नंदकुमार निकम यांनी केले . यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फुलफगरजी म्हणाले देवदैठण ही देवांची भूमी आहे तुम्ही पुढील सात दिवस देवांच्या सहवासात राहणार आहात. तुम्हाला ह्या गावामध्ये भरपूर शिकण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढील आयुष्यात उपयोगी पडतील.
प्रास्ताविक करताना कार्यक्रमाधिकारी डॉ अशोक काकडे यांनी शिबीराचा मुख्य उद्येश विद्यार्थ्या मध्ये श्रमसंस्कार रुजविणे, वृक्षारोपण , पाणी व मृदा परीक्षण , सामाजिक आर्थिक सर्वेक्षण , लोकसंख्या जनजागृती , ऊर्जा लेखापरिक्षण जलसंवर्धन ,स्वच्छता अभियान ऐतिहासिक व सांस्कृतिक सर्वेक्षण, राष्ट्रीय एकात्मता याची माहिती सर्वांना दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के सी मोहिते विद्यार्थ्यांशी बोलत असताना तुम्ही आता विद्यार्थी नसून स्वयंसेवक आहात. स्वतःची सेवा करण्याबरोबरच येथील समाजाची आणि निसर्गाची सुद्धा सेवा केली पाहिजे. तसेच ग्रामस्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे या प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. संत निंबराज महाराज देवस्थानचे उपाध्यक्ष मा. दंडवते गुरुजी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले.तसेच सरपंच विश्वासभाऊ गुंजाळ यांनी हिवाळी शिबिराला लागणारी सर्वतोपरी मदत येथील ग्रामस्थ करतील अशी ग्वाही दिली.
यावेळी प्राचार्य डॉ के .सी .मोहिते ,उपप्राचार्य एच. एस जाधव,विज्ञान शाखा प्रमुख डॉ एन एम घनगावकर , प्रा. एम यु आयुब . डॉ. बी. के तांबे , प्रा.अर्जुन वणवे , डॉ.अतुल जेठे , डॉ. अजित चंदनशिवे, डॉ. ए. डी केत , डॉ. एस. पी कांबळे , प्रा.डी. पी.टोणगे ,प्रा. अमोल पितळे, सरपंच जयश्री विश्वास गुंजाळ ,उपसरपंच सचिन लोखंडे , संतनिबराज महाराज विदयालयाचे प्राचार्य बी .बी .डोके, केंद्रप्रमुख काशिनाथ लोखंडे , मुख्याध्यापक मंदा कौठाळे,लक्ष्मीकांत दंडवते तुषार वाघमारे , माऊली बनकर,निखिल मगर, पत्रकार पंकज गणवीर, दीपक वाघमारे, प्रा. संदीप घावटे आदीसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापिका क्रांती पैठणकर यांनी तर प्राध्यापिका रेणुका करपे यांनी आभार मानले
