घोडनदी च्या पुलावरून अज्ञात वृद्धाची उडी मारून आत्महत्या
घोडनदी च्या पुलावरून अज्ञात वृद्धाची उडी मारून आत्महत्या
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
शिरूर व श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवरती असणाऱ्या नगर पुणे हायवे वरील घोडनदीच्या १७ कमानीच्या पुला वरून दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळच्या वेळेस वयोवृद्ध व्यक्तीने नदीच्या पुलावरून पाण्यामध्ये उडी मारली ही घटना समजल्यानंतर बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली असता २४ तासाने वृद्धाचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यास टिमला यश मिळाले परंतु सदरील मयत व्यक्तीची ओळख पटली नसून तो व्यक्ती कोण आहे ? व त्यानी आत्महत्या का केली ? याचा शोध बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे . सदरील मृतदेह हा ओळखीसाठी शीतगृहामध्ये ठेवण्यात आलेला आहे असे पोलीस स्टेशन यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मृत व्यक्तीची काही माहिती मिळाल्यास बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे मो – 9822122374 व सहाय्यक फौजदार मारुती कोळपे मो – 9822783352 यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान बेलवंडी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे .
मृत व्यक्तीचे वर्णन –
✍️ अंदाजे 70 ते 75 वर्षे वय
✍️ उंच शरीर ‘
✍️ गहू वर्ण
✍️ सडपातळ बांधा
✍️ पांढऱ्या रंगाची दाढी
