ताज्या घडामोडी

सुपा पोलीसांची कारवाई 28 लाखांचा गुटखा पकडला ,सहा पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांची दमदार कारवाई

सुपा पोलीसांची कारवाई 28 लाखांचा गुटखा पकडला ,सहा पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांची दमदार कारवाई

सुपा प्रतिनिधी – प्रतिक शेळके
(मुख्य संपादक – अमोल बोरगे )

पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन सहा पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना दिनांक 23 जुन 2025 रोजी मध्य रात्री गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अहिल्यानगर ते पुणे रोडने टाटा कंपनीचा मालट्रक नबंर एन.एल. 01 ए.एफ. 9712 मधुन अवैद्य मालाची वाहतुक करुन घेवुन जात आहे.
    अशी खात्रीशीर बातमी असल्याने सपोनि सोमनाथ दिवटे तसेच रात्रगस्ती करीता मोबाईल क्र. 1 चे चालक पोकाँ/ ढाकणे, पोहेकाँ/1599 धामणे,
मोबाईल क्र. 2 चे अमंलदार पोना/ बर्डे, व पोकाँ/ दरेकर असे सपोनि सोमनाथ दिवटे सह रात्री १ वा पवारवाडी घाटाचे पुढे नाकाबंदी लावली असता
दिनांक 23 जुन 2025 रोजी पहाटे साडे तीन वा. सदरची मालट्रक अहिल्यानगर बाजुकडुन येताना दिसली त्या गाडीस सुपा पोलीस टीम यांनी हात दाखवुन थांबविली त्यातील चालक ट्रक मधुन खाली उतरला असता त्याचेकडे कागदपत्राची मागणी केली असता त्यांने कागदपत्रे घेण्यासाठी तो
ड्रायव्हर बाजुने मालट्रक मध्ये वर चढत असतांना सुपा पोलीस यांना हुलकावणी अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला त्यांचा सुपा पोलिसांनी शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. मालट्रक मधिल क्लिनरला त्याचे नाव गाव विचारता त्यांने त्यांचे नाव मोसीन खान अकबर खान वय-20 वर्ष रा. गोलागुठाण ता. देवार जि. कन्नुर राज्य मध्य प्रदेश असे असल्यांचे सांगीतले असुन मालट्रक वरील पळुन गेलेल्या चालकाचे नाव संजय यादव रा. मध्यप्रदेश असे सांगुन मालट्रक मालकाचे नाव विचारता त्यांने मला माहित नसलेबाबत सांगीतले त्यास मालट्रकमध्ये काय माल आहे याबाबत विचारणा करता त्याने मालट्रकमध्ये गहु व चनाडाळ असल्याचे सांगीतले असता सुपा पोलिसांनी मालट्रक मधिल मालाची पाहणी करता पोलिसांना गहु व चनाडाळीच्या गोण्या मागील बाजुस दिसुन आल्या व पाठिमागील बाजुस पाढ-या रंगाच्या गोण्यामध्ये बाँक्स पॅक केलेले मिळुन आल्याने पोलिसांनी त्यास पांढ-या रंगाच्या गोण्यामधिल मालाबाबत विचारणा करता त्यांने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने सदर मालाबाबत सुपा पोलिसांना शंका आल्याने व त्यांने समाधानकारक उत्तर न दिल्याने सुपा पोलिसांनी सदरची मालट्रक तपासकामी सुपा पोलीस
स्टेशन येथे घेवुन आले.
त्यानतंर दिनांक 23 जुन2025 रोजी दुपारी 01/45 वा अन्न सुरक्षा अधिकारी श्री प्रदिप परशुराम पवार नेम- अहिल्यानगर हे व
सरकारी पंच यांचे समक्ष मपोसई- एम.एच. जेजोट यांनी ई-साक्ष मध्ये टाटा कंपनीचा मालट्रक नबंर एन.एल. 01 ए.एफ. 9712 मधिल
सामानाची तपासणी केली असता सदर मालट्रक मध्ये प्रतिबंधित सुंगधित तबांखुचा रुपये एकुण 11,02,500/- रु किं एकुण अक्षरी
अकारा लाख दोन हजार पाचशे रुपये इतक्या रकमेचे प्रतिबंधित अन्न पदार्थाचे सिलबंद पॅकेट मिळुन आल्याने तसेच रु
1700000/- रुपये किमंतीची मालट्रक ही प्रतिबंधित अन्न पदार्थ वाहतुक कामी वापर होवु नये म्हणुन जप्त करुन ताब्यात घेतली आहे.
तरी आरोपी नामे 1) मोसीन खान अकबर खान वय-20 वर्ष रा. गोलागुठाण ता. देवार जि. कन्नुर राज्य मध्य प्रदेश 2) चालक संजय यादव
रा. मध्यप्रदेश ( पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही) 3) इन्दौर ट्रक ऑनर अँण्ड ट्रान्सपोर्ट एसोसिएशन इन्दोर चे मालक (नाव पत्ता माहित
नाही )
) यांचे विरुद्ध सुपा पोलीस स्टेशनल येथे गुनहा रजि नं 235/2025 बी.एन.एस. 223, 274,275,123 सह अन्न सुरक्षा आणि मनके
अधिनियम 2006 चे कलम 26(2) (iv), 27 (2) (e), 30(2) (a), 3 (1) (zz)(iv), 59 प्रमाणे फिर्याद दिली आहे.
सदरची कारवाई हि श्री सोमनाथ घार्गे सोमा पोलीस अधिक्षक सो अहिल्यानगर, श्री प्रशांत खैरे, मा अपर
पोलीस अधिक्षक सो अहिल्यानगर, श्री अमोल भारती,मा उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग यांचे
मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सो सुपा पोलीस स्टेशनल, श्री सोमनाथ दिवटे, मपोसई एम एच जेजोट तसेच
पोहेकॉ/1599 अमोल धामणे, पोहेकॉ/744 अशोक मरकड, पोकॉ/781 विकास गायकवाड, पोकॉ/2662 रमेश दरेकर,
पोकॉ/653 ताराचंद जाधव, पोकॉ/2482 योगेश सातपुते व चापोकॉ/168 राहुल ढाकणे यांनी सदरची कारवाई केली आहे या कारवाईमुळे सुपा पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व त्यांच्या सोपा पोलीस स्टेशनच्या पोलीस टीमचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!