ताज्या घडामोडी

आपण करतो तो प्रवास , साधू , संत करतात , ती तीर्थ यात्रा . हभप नारायण महाराज काळे .

आपण करतो तो प्रवास , साधू , संत करतात , ती तीर्थ यात्रा –
हभप नारायण महाराज काळे .

पारनेर :- प्रतिनिधी :- सुदाम दरेकर

 आपण करतो तो प्रवास , साधू , संत करतात , ती तीर्थ यात्रा असते , माणसाने मरण्याअगोदर एकदा तरी तीर्थ यात्रा करावी , असे प्रतिपादन श्री क्षेत्र पैठण येथील ज्ञानमार्तंड , श्री स्वामी कथाकार हभप नारायण महाराज काळे यांनी केले आहे .
स्वामी भक्त अनिल आवारी व स्वामी भक्तांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या रांधे च्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान येथे स्वामी कथेच्या ३ ऱ्या दिवशीच्या निरोपण प्रसंगी ज्ञानमार्तंड हभप नारायण महाराज काळे बोलताना पुढे म्हणाले की , माणसाला जोपर्यंत हात पाय आहे , तो पर्यंत पायी तीर्थयात्रा करावी , तो पर्यंत करू नये .देवांच्या चरणस्पर्शाने नदया पवित्र झाल्या आहेत . श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नंतर सर्वांत जास्त मंगळवेढे येथे १२ वर्षे राहिले , पण तेथील लोकांना त्यांचा महिमा कळला नाही . आपल्या महाराष्ट्रातील लोकांना माणूस मेल्याशिवाय त्याचे महत्व समजत नाही , त्यासाठी त्याने मरावे लागते , ही शोकांतिका आहे , पण हे रांधेतील लोकांना महाराज कळाले , म्हणून येथे मोठे भव्य व दिव्य मंदीर उभे राहिले . जसे श्री क्षेत्र अक्कलकोट चे महत्त्व आहे , तसेच रांधे नगरी चे आहे . महाराज उदंड राहिले , उदंड फिरले , पण त्यांना खरे प्रेम मिळाले , ते रांधे नगरी त मिळाले , म्हणून ते येथे आले , त्यासाठी त्यांना प्रेमाने व श्रद्धेने शरण गेले पाहिजे .सोमवारी महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे . आपण येथे जे काही मांदिआळी च्या रूपाने जमलो आहे , त्याला कारण केवळ अनिल आवारी व त्यांचे सहकारी कारणीभूत आहेत .
महाराजां चा श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये पहिला भक्त हा मुस्लिम समाजाचा होता . तेथे त्यांनी सामाजिक ऐक्य व समतेचा संदेश दिला . पंढरपूर मध्ये त्यांनी सांगितले की , मी च विठ्ठल आहे . जो पर्यंत घराचे मंदीर करता येत नाही , तो पर्यंत मंदीरात जाऊ नये . प्रत्येक गावाच्या चौकात ओटा असतो व तेथे बसलेला चांडाळ चौकडीनेही महाराजांना सोडले नाही . महाराजांनी आपल्या निस्सीम भक्त असलेल्या चोळाप्पा ची विविध प्रकारची परीक्षा पाहिली , पण ते त्या परीक्षेत पास झाले , तरी देखील महाराजांनी सर्व प्रथम चोळाप्पांच्या पत्नीला सर्व प्रथम आपले मूळ रूपातील अद्भूत दर्शन दिले . जसे की , विठ्ठलाची निस्सीम भक्ती करणाऱ्या संत तुकारामाच्या आधी त्यांची पत्नी जिजाऊंना दिले . ही स्वामी कथा सर्वत्र ऐकायला मिळत नाही . जो भक्त एकनिष्ठ होऊन ही कथा ऐकतो , त्याच्या अडचणी दूर होतात , त्याला अंतकरणातून महाराजांचे दर्शन होते , एवढा या कथेचा महिमा आहे . या कथेच्या माध्यमातून मला महाराज जेथे गेले , तेथे जाण्याची संधी मिळाली . जन्म मृत्यूच्या फेऱ्यात वाचायचे असेल , तर श्री स्वामी समर्थ महाराजां चे भजन व नामस्मरण करा . काही गोष्टी अशा आहेत की , त्या फिरविल्या शिवाय टिकत नाही , खराब होतात , जसे की , भाकरी व घोडा . साधू , संतांना एकांत प्रिय असतो , त्यांना एकांतात विचार सुचतात , म्हणून ते एकांतात असतात , तर दुर्जूनांना दुष्विचार सुचतात . भूतकाळात काय झाले, ते उकरून काढून वा त्यांचे चिंतन करून वर्तमान काळ खराब करायचा नाही . महाराजांना निशंकपणे शरण जा , ते प्रत्येकाच्या तना व मनात आहे . आपल्याला बोलावून जे प्रेम जेथे मिळत नाही , तेथे जाऊ नये व जेथे न बोलवता , गेल्यावर प्रेम मिळते , तेथे हक्काने जावे , असे ज्ञानमार्तंड हभप नारायण महाराज काळे यांनी सांगितले .
स्वामी कथेच्या ३ ऱ्या दिवशी भजन गात महिला व पुरुष भाविक भक्त तल्लीन होऊन टाळया वाजवत , नाचत , गात होते . कथेला पुर्ण विराम दिल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती नंतर महाप्रसादाने कथेची सांगता करण्यात आली . ऐकण्यासाठी पारनेर , जुन्नर तालुक्यातील स्वामी भक्त , दुचाकी , चार चाकी , अगदी ट्रॅक्टर मध्ये बसून मोठ्या संख्येने रांधेच्या माळवाडी येथे उपस्थिती लावत असे .
उद्या सोमवार दि . ३१ रोजी रांधे च्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान मंदीरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुर्तीची वाजत गाजत रांधे गावातील सर्व देवी देवतांची भेटी घेत मिरवणूकी व्दारे वेद व मंत्रांच्या उद्घोषात प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!