ताज्या घडामोडी

घोड धरणामध्ये विषारी औषध व केमिकल टाकून मासेमारी नागरिकांमध्ये संताप

घोड धरणामध्ये विषारी औषध व केमिकल टाकून मासेमारी नागरिकांमध्ये संताप

श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे 

श्रीगोंदा व शिरूर तालुक्यातील घोड जलाशयामध्ये काही स्थानिक लोक व काही मासेमारी करणारे व्यावसायिक पाण्यामध्ये विषारी औषधे व केमिकल टाकून मासेमारी करत असल्याचा संशय घोड धरणाचे व्यवस्थापक शांताराम शितोळे मु.पो. शिंदोडी ता.शिरूर जिल्हा पुणे यांना संशय आला असून त्यांनी याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रारी अर्ज दिला आहे त्यामध्ये त्यांनी काही संशयित यांची नावे दिली आहेत व मरण पावलेले मासे तसेच परिसरामध्ये सापडलेले औषधे व केमिकल च्या बाटल्या यांचे फोटो पुरावा म्हणून सादर केल्याची प्राथमिक माहिती समजत आहे ?
      सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदा व शिरूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या घोडनदी वरती असणाऱ्या घोड धरणामध्ये काही दिवसांपासून मासेमारी करणारे स्थानिक व काही मासेमारी करणारी व्यावसायिक कोणतीही परवानगी न घेता पाण्यामध्ये विषारी औषधे व केमिकल टाकून मासेमारी करत असून व ते मासे परस्पर विक्री करत असल्याचे निदर्शनात आले असून विषारी औषध व केमिकल पासून पकडलेले मासे हे शरीरासाठी हानिकारक असून त्यामुळे मानवी जीवनावर दुष्परिणाम होऊ शकतो तसेच पाण्यामध्ये विषयाचे प्रमाण वाढवून भविष्यामध्ये शेतीला व जलचर प्राणी तसेच पक्षी यांना धोका निर्माण होऊ शकतो .त्यामुळे अशा अनैसर्गिक पद्धतीने मासे पकडणाऱ्या मासेमारी करणाऱ्या व्यवसायकांवरती ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!