मिंडा कंपनी ते बाबुर्डी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे-मनसे नेते रविश रासकर यांचा उपोषणाचा इशारा.
मिंडा कंपनी ते बाबुर्डी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे-मनसे नेते रविश रासकर यांचा उपोषणाचा इशारा.
सुपा प्रतिनिधी – प्रतीक शेळके
मिंडा कंपनी ते बाबुर्डी पर्यंत दीं. ०५/०१/२०२४ रस्त्याचे काम चालू झाले होते. सदर रस्त्याचे कामाची मुदत्त १२ महिने आहे.
इस्टिमेट नुसार रस्त्या रुंदीकरण, माती भराव, खडीकरण, मुरूम , बाजू पट्टी , कच्चे घटस, संकीर्ण बाबी मजबुतीकरण, आणि चांगले डांबरीकरण असे करण्यास सांगितले आहे.
सदर रस्त्याची कामे होऊन थोडा अवधी गेला नाही तोच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडलेत आणि रस्ता उखाडलेला आहे. तरी इस्टिमेट नुसार सदर ठेकेदाराने काम केलेली नाही. रस्त्याच्या साईडने पाणी जाण्यासाठी घटस नाहीत ,रस्त्यावर साईड पट्ट्या पण मारलेल्या नाहीत आणि चालू घडीत आता रस्त्याच्या ठिकठिकाणी मोठमोठाली खड्डे पडलेले आहेत रस्ता बऱ्याच ठिकाणी उखडलेला आहे.
तरी आपण ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून त्या ठेकेदाराची लायसन कायमस्वरूपी बंद करावे आणि हे काम दि. ०५ जानेवारी पर्यंत जर इस्टिमेट नुसार पूर्ण झाले नाही तर मी म्हसने फाटा फेज २ एमआयडीसी चौक येथे दि. १३ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार आहे. असे मनसे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिले आहे.
