ताज्या घडामोडी

राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविणार आमदार काशिनाथ दाते सर .

राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविणार 
आमदार काशिनाथ दाते सर .

पारनेर प्रतिनिधी :- सुदाम दरेकर :-

    राज्यातील पत्रकारांच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार चे लक्ष वेधून त्या मार्गी लावण्यासाठी विधानसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात सहकारी आमदारांच्या साथीने आवाज उठविण्यात येईल , असा शब्द पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिला आहे .
     पत्रकार बांधव व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे नूतन निर्वाचीत काशिनाथ दाते सर यांचा नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती , पत्रकार संघाचा पंचा , शाल , पेशवाई पगडी , पुष्पहार घालून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डॉ . विश्वासराव आरोटे सर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला . या प्रसंगी आ . दाते सर पुढे म्हणाले की , समाजाचा आरसा म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते , पण पत्रकारांचे च प्रश्न दुर्लक्षित राहत असून त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे . हे काम मी विधानसभेच्या अधिवेशनात मांडून करणार आहे , असे ही आ . दाते सर म्हणाले .
      यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजोग काळदंते , नगर जिल्हा सचिव व दैनिक पारनेर समर्थ चे संपादक सुरेश खोसे पाटील , पारनेर तालुकाध्यक्ष संतोषराव तांबे , मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बाबाजी वाघमारे , पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय उनवणे , उपाध्यक्ष भास्करराव कवाद , जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे , वृत्तपत्र छायाचित्रकार जय हरेल व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!