स्वार्थाशिवाय जीवन जगणारा मनुष्यच आनंद प्रस्थापित करतो! आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांचे प्रतिपादन, धुळे साक्री येथील पिंपळनेरला बर्शी महोत्सवानिमित्त अध्यात्मिक प्रवचन
स्वार्थाशिवाय जीवन जगणारा मनुष्यच आनंद प्रस्थापित करतो! आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांचे प्रतिपादन, धुळे साक्री येथील पिंपळनेरला बर्शी महोत्सवानिमित्त अध्यात्मिक प्रवचन
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर , पारनेर –
जेवणात सुखाबरोबरच भगवंताची प्राप्ती करायचे असेल तर स्वतःमधील षड अधिकारांना विकारांना दूर करावे. अध्यात्म हेच जीवनाचा अविष्कार असून ज्ञान भक्तीच्या जोरावर आत्मकल्याण करून भगवंत प्राप्ती करता येते. स्वार्थाशिवाय जीवन जगणारा मनुष्यच मानवता व आनंद प्रस्थापित करू शकतो, असे प्रतिपादन पिंपळनेर येथील ओम दादाजी दरबाराचे प्रमुख आद्य स्वामी शिवानंद दादाजी महाराज यांनी केले. येथील धुनीवाले महाराज दरबारात स्वामी धुनीवाले दादाजी महाराज खंडवा यांच्या बार्शी निमित्त आयोजित अध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. शरीर हे आपले साधन असून आद्य परमात्म्याची प्राप्ती हे आपल्या आत्म्याचे ध्येय आहे. सद्गुरु जर हे तपोबलाने युक्त असतील तर आपण याच देहाच्या साह्याने भगवंत स्वरूप बनू शकतो. आद्य दादाजी हेच आपले आराध्य दैवत आहेत आणि साधनेने त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. हे अटल सत्य आहे असा उपदेश आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांनी दिला यावेळी श्री.श्री.महान 1008 धनंजय सरकार जी,शिवाजी लोंढे,प्रमोद शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वात्मक ओम शिवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गोरख तांबे, सचिव जालिंदर दांगडे, खजिनदार बाळासाहेब भंडारी, कृष्णांत शिंदे,बबनराव खेडकर, पिंपळनेर दरबारचे अध्यक्ष अनिल सोनवणे, कैलास राजपूत, श्री सिन्नरकर, मदन शेठ पटेल, श्री खेडकर, अशोक शेठ कोठावदे, नानाजी पगारे, दयाराम कर्हेकर, श्री शिसोदे, भट्टू सोनवणे , सतीश करपे, अंबादास चव्हाण, भूषण कोठावदे, शिवाजी लोंढे, शिवप्रसाद दिवटे, डॉ. सतीश पगारे, अमोल नलगे, रावसाहेब नागरे, सुभाष विधाते, अनंत लंगडे यांनी परिश्रम घेतले. तसेच या ठिकाणी चहापान, प्रसाद, आलेल्या भाविकांची राहण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद शिंदे यांनी केले.
