सायली औटी ( दरेकर ) ही महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कारने सन्मानित अरीवर्क कलेमुळे पुरस्कार सन्मानित
सायली औटी ( दरेकर ) ही महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कारने सन्मानित
अरीवर्क कलेमुळे पुरस्कार सन्मानित :-
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
पळवे खुर्द येथील रहिवासी असणारी सायली औटी( दरेकर ) हिने कॉलेजचे शिक्षण सुरू असताना काहीतरी उद्योग व्यवसाय करण्याचे ठरवले आणि तिने शिरूर या ठिकाणी ब्लाउज डिजाइनिंग हे काम शिकण्याचे ठरवले आणि शिरूर या ठिकाणी एक वर्ष हे काम शिकण्यासाठी क्लास जॉईन केला. आणि ही कला चांगल्या प्रकारे शिकून घेतली. आणि असा व्यवसाय अनेक महिलांना येण्यासाठी पारनेर या ठिकाणी तिने या कामाचे आपल्याच घरी क्लासेस द्वारिका अरी वर्क नावाने चालू केले. आणि अनेक महिलांना हे काम शिकवले. तिच्या चांगल्या कामाची अनेकांनी प्रशंसा केली. तसेच तिची रविवार दि.27 रोजी पुणे या ठिकाणी सिने सृष्टीतील प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सायली हिने इच्छुक मुली आणि महिलांनी ही कला शिकण्याचे आवाहन केले आहे यामुळे पारनेर तसेच पळवे खुर्द येथील ग्रामस्थ महिला तसेच तिचे नातेवाईक यांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले..
