कुकडी कालव्याचे आवर्तन सुटणार दि .१० डिसेंबर ला , तर पिंपळगाव जोगा दि ७ डिसेंबरला . आवर्तन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची आमदार काशिनाथ दातेंनी घेतली भेट .
कुकडी कालव्याचे आवर्तन सुटणार दि .१० डिसेंबर ला , तर पिंपळगाव जोगा दि ७ डिसेंबरला .
आवर्तन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची आमदार काशिनाथ दातेंनी घेतली भेट .
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ पारनेर तालुक्यातील गावांना कुकडी आवर्तन सोडणे बाबत लाभक्षेत्रातील शेतक-यांची तीव्र मागणी आहे , याबाबत आपण लक्ष घालावे अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आमदार काशिनाथ दाते व तालुक्यातील शिष्टमंडळाने केली असता , यांस उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत , कुकडी च्या पाण्याचे आवर्तन मंगळवार दि . १० डिसेंबर ला सोडणार आसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन शनिवार दि . ७ डिसेंबरला सुटणार आहे .
आमदार काशिनाथ दाते सर यांनी कुकडी कालव्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांच्याशी पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन सोडण्याबाबत चर्चा केली असता त्यांनी शनिवार दि . ७ डिसेंबरला सोडणार असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव चेडे, लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष सुनील राव थोरात, विश्वनाथ चौधरी व इतर मान्यवर उपस्थितीत होते.आमदार दाते यांनी निवडणूक पार पडल्यानंतर मतदारसंघाच्या विविध पश्नांवर काम करण्यास सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून , कुकडी डावा कालवा आवर्तना बाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेत आग्रही मागणी केली.
पारनेर तालुक्यातील शेतक-यांनी नगदी पीक म्हणून कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे . या व्यतिरिक्त इतर पिकांची लागवड शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. कांदा पीक व इतर पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना कुकडी कालव्याचे आवर्तन त्वरित सोडण्यात यावे , अशी मागणी पाणी वाटप संस्थेसह शेतक-यांनी आमदार दाते यांच्याकडे केली होती. त्यानुसार आज उपमुख्यमंत्री पवार यांची आमदार दाते यांनी भेट घेत ही मागणी केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लाभक्षेत्रातील शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.
