रांधेत चंपाषष्ठी उत्सवाचे आयोजन .
रांधेत चंपाषष्ठी उत्सवाचे आयोजन .
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
सालाबादप्रमाणे प्रमाणे मार्गशिष शु ६ ला चंपाषष्ठीचा उत्सव रांधे गावात साजरा करण्यात येणार असून येणाऱ्या भाविकांसाठी सायंकाळी आमटी भाकरी चा महाप्रसादाच नियोजन करण्यात आले असल्याची माहिती रांधुबाई देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष विठ्ठल आवारी यांनी दिली .
सायंकाळी ६ वा अळकुटी येथील शाहीर संतोष गुळवे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे , या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठल आवारी यांनी केले .
रांधुबाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने गावातील ग्रामदैवत असलेल्या मंदिरां पैकी विठ्ठल मंदिर आणि रांधुबाई मंदिर यांचे गळतीचे काम पूर्ण केले असून उर्वरित मंदिरांच्या गळतीचे काम हातात घेण्यात आले आहे . ज्यांना जसे शक्य होईल , त्यांनी त्याप्रमाणात आर्थिक सहकार्य करावे , अशी विनंती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त कैलास आवारी आणि किरण आवारी यांनी केले आहे .
चंपाषष्ठी उत्सवासाठी रांधे ग्रामस्थ आणि रांधुबाई देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार असून येणाऱ्या भाविकांची कोणतीच अडचण होणार नाही , याची काळजी घेण्यात आली आहे .
