पळवे खुर्द (मठ वस्ती) येथील मारुती मंदिरामध्ये सप्ताह प्रारंभ :- मान्यवर कीर्तनकारांची कीर्तन सेवा
पळवे खुर्द (मठ वस्ती) येथील मारुती मंदिरामध्ये सप्ताह प्रारंभ :- मान्यवर कीर्तनकारांची कीर्तन सेवा
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
पळवे खुर्द येथील मठ वस्तीवरील मारुती मंदिरामध्ये याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून वै.प.पू. ह भ प रामदास महाराज साबळे, तसेच व्यासपीठ चालक ह भ प महाराज नरवडे यांच्या मार्गदर्श नाने तसेच ग्रामस्थ तसेच संघर्ष तरुण मित्र मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू झाला आहे. मंगळवार दि. 25 मे रोजी हा सप्ताह प्रारंभ झाला. सप्ताह दरम्यान विविध मान्यवर कीर्तनकार यांच्या सेवा पार पडणार आहेत. सप्ताहाचे यंदाचे 18 वे वर्ष आहे. या ठिकाणी पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 किर्तन सोहळा, रात्री 11 ते पहाटे 4 हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम आहेत.मंगळवार दि.25 मार्च रोजी ह भ प अरुण महाराज उंबरेकर यांची कीर्तन सेवा पार पडली. बुधवार दि. 26 मार्च रोजी गुलाब महाराज करंजुले (सर) यांची कीर्तन सेवा होणार आहे. गुरुवार दि. 27 रोजी ह भ प मिठू महाराज साबळे शुक्रवार दि.28 रोजी ह भ प अशोक महाराज शिंदे, शनिवार दि.29 रोजी ह भ प बाळकृष्ण महाराज दळवी, रविवार दि.30 रोजी ह भ प बाळकृष्ण महाराज सोनुळे, सोमवार दि. 31 रोजी ह भ प गोरक्षनाथ महाराज बनकर, यांचे कीर्तन होणार आहे. तर मंगळवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान ह भ प सोमनाथ महाराज बारगळ (सर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. काल्याच्या कीर्तनानंतर सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह दरम्यान अखंड विना पहारा,चोपदार, पार्किंग व्यवस्था, चोख ठेवण्यात आली आहे. या उत्साहात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
