अहमदनगर शिक्षक सोसायटीत शिक्षकेत्तर धुमाळ,वाळके विजयी :- प्रचारक म्हणून अमोद नलगे सर यांनी काम पाहिले
अहमदनगर शिक्षक सोसायटीत शिक्षकेत्तर धुमाळ,वाळके विजयी :- प्रचारक म्हणून अमोद नलगे सर यांनी काम पाहिले
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को ऑप. क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षक शिक्षकेत्तर स्वाभिमानी परिवर्तन पॅनलच्या सर्वच्या सर्व 21 उमेदवार प्रचंड मताने विजयी झाले असून या मध्ये शिक्षकेत्तर उमेदवार किशोर सयाजी धुमाळ व अर्जुन तान्हाजी वाळके यांचा दणदणीत विजय झाला आहे. अशी माहिती आमोद नलगे यांनी दिली आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी पॅनल कडून एकूण 21 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी दोन शिक्षकेत्तर उमेदवारांनी निवडणूक लढविली व ते प्रचंड मताने विजयी झाले. या निवडणुकीत मतदारांनी स्वाभिमानी पॅनलाला भरभरून मतदान केले. पॅनल मध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेमध्ये काम करणारे उमेदवार होते त्यापैकी सर्व उमेदवारांना मतदारांनी विजयी केले आहे. किशोर धुमाळ यांना सर्वसाधारण मधून 4562 मते मिळाली अर्जुन वाळके यांना 4638 मते मिळाली त्यांच्या विरोधात प्रा. संजय वाळे यांना 3950 मते मिळाली अर्जुन वाळके यांना विजयी उमेदवारामध्ये पाचव्या क्रमांकाची मते मिळाली. सोसायटीच्या निवडणुकी मधून शिक्षकेत्तरामधून संचालक होण्याची संधी मिळाली आहे
विजयी उमेदवारांचे शिक्षकेत्तर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह शिवाजी खांडेकर,पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे,जिल्हाध्यक्ष भीमाशंकर तोरमल,जिल्हा सचिव भानुदास दळवी,राजू पठाण, परसराम वेताळ, भाऊसाहेब धनवटे, आमोद नलगे, पद्माकर गोसावी, किशोर मुथा, शशिकांत भालेकर, शिवाजी चासकर, भास्कर सदगीर,आण्णासाहेब चिखलठाणे आदिनी अभिनंदन केले.
