ताज्या घडामोडीराजकीय

कुकडी कारखान्याचे उपाध्यक्ष विकेक सोपान पवार उर्फ आबा पाटील पवार पक्षांतरच्या भुमिकेत फक्त चर्चा च का वास्तवता ?

कुकडी कारखान्याचे उपाध्यक्ष विकेक सोपान पवार उर्फ आबा पाटील पवार पक्षांतरच्या भुमिकेत फक्त चर्चा च का वास्तवता ?

प्रतिनिधी – प्रा. केशव कातोरे ( कार्यकारी संपादक )

श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उलथापालथ होताना आपण पाहतोय अनेक दिग्गज नेते व कार्यकर्ते वेगाने पक्षांतर करत आहेत नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, राहुल जगताप यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अतुलजी लोखंडे यांनी एकनाथ शिंदे शिवसेना गटात प्रवेश करत राहुल जगताप यांना धक्का दिला आता येळपणे गावांसह येळपणे जिल्हा परिषद गटांत कुकडी कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष विवेक सोपान पवार उर्फ आबा पाटील पवार हे राहुल जगताप गटांला रामराम ठोकत थेट श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा गेल्या महिनाभरापासून येळपणे गटांसह तालुक्यातील राजकारणात होत आहे . नुकतेच माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी विवेक पवार यांच्या घरी भेट देत घरातील जुन्या जाणत्या माणसांची आपुलकीने चौकशी केली हि भेट जरी सदिच्छा भेट असली तरी या भेटीला पक्षांतराची झालर असल्याचे समजते.विवेक सोपान पवार हे एकेकाळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे खंदे समर्थक असणारे आदरणीय कै अण्णा पाटील पवार यांचे पुतणे होय .अण्णा पाटील पवार हे बबनराव पाचपुते यांच्या सक्रिय राजकारणात सहभागी असल्याने त्यांना शह देण्यासाठी विरोधकांनी विवेक पवार यांना राजकीय पाठबळ दिले पुढे विवेक पवार हे ही राहुल जगताप यांचे कट्टर समर्थक व विश्वासु म्हणुन ओळखले जावु लागले राहुल जगताप यांनी ही त्यांना कुकडी कारखान्याचे संचालक पुढे जावुन कुकडी कारखान्याचे उपाध्यक्ष पद बिनविरोध बहाल केले परंतु आता विवेक पवार पक्षांतर करुन येळपणे गावाचे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदांचे प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत अर्थातच अशी चर्चा होत आहे या संदर्भात विवेक पवार यांच्या शी संपर्क साधला असता अशा चर्चा होत आहे हे मी नाकारत नाही परंतु मी आता कुकडी कारखान्याचा उपाध्यक्ष आहे अजुन माझ्या मनात पक्षांतराची कोणतीही भावना नाही परंतु गेल्या काही दिवसांपासून येळपणे गावांसह परीसरातील शेतकरी, कष्टकरी यांचे उसाचे प्रश्न असतील किंवा व्यक्तिगत कोणतेही प्रश्न सोडवता येत नाही अनेक शेतकरी आपले उसाचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात परंतु कुकडी कारखाना अद्याप बंद असल्याने मी हतबल होतो म्हणून कदाचित जनसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी मी पक्षांतरांचा विचार करु शकतो परंतु अद्याप माझे तसे काही ठरले नाही त्यांनी बोलताना आमचे नेते राहुल जगताप यांच्याशी सहजपणे संपर्क होत नसल्याची खंतही व्यक्त केली.

 येळपणे गावांसह येळपणे जिल्हा परिषद गटांत राहुल जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे तो आबा पाटील पवार यांच्या निर्णयाला कशी साथ देतोय हे महत्त्वाचे आहे तसेच आबा पाटील पवार यांनी पक्षांतर केले तर भारतीय जनता पार्टी चे अर्थातच माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मानणारा गट त्यांना सहजपणे स्विकारणार का वेगळे राजकारण होणार हे येणार काळच ठरवेल.

कोणी गेले म्हणून नेता रणांगण सोडत नाही 

 कुकडी कारखान्याचे उपाध्यक्ष विवेक पवार यांच्या पक्षातराच्या चर्चेत जर काही वास्तवता असेल व तसे काही झाले तर नक्कीच विवेक पवार यांच्या जाण्याने काही ना काही हाणी ही आपल्या गटांची होणार पण कुकडी परीवार असेल किंवा राहुल जगताप गट असेल यांनी नेहमीच कार्यकर्ते यांना राजकीय बळ देवुन उभं करण्याचे काम केले आहे ज्यांच्या पक्षांतराची चर्चा होत आहे त्यांना राहुल जगताप यांनी कुकडी कारखान्याचे उपाध्यक्ष पद दिले अनेक वेळा राजकारणात ताकद दिली आज नेता किंवा आपला गट अडचणीत असताना आपण नेत्याला ताकद देवुन उभं राहीलं पाहिजे काही अडचणी किंवा गैरसमज असतील ते दुर होवुन विवेक पवार यांनी आपल्या नेत्यांबरोबर च राहावं असं मला प्रामाणिकपणे वाटते पण कोणी गेले म्हणून नेता रणांगण सोडत नाही कुकडी परीवार असेल किंवा राहुल जगताप असतील यांना मानणारा मोठा वर्ग आपल्या तालुक्यात आहे नक्कीच कोणी गेले तर हानी ही होतीच पण ती भरुन काढण्यासाठी माझ्यासारखे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते खंबीर पणे उभे आहेत. – संभाजी राजे देविकर ( संचालक कुकडी कारखाना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!