ओंकार साखर कारखाना युनिट नंबर २ निलंगाचा तोडणी : वाहतूक करार पूर्ण
ओंकार साखर कारखाना युनिट नंबर २ निलंगाचा तोडणी : वाहतूक करार पूर्ण
प्रतिनिधी – अमोल बोरगे
निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर लिमिटेड लिज ओंकार साखर कारखाना युनिट नं २ या कारखान्याने वाहतुकीचे करार पूर्ण केले असून स्थानिक व बाहेरील तोडणी वाहतूकदार यांच्या खात्यावर हंगाम २०२५-२६ च्या हंगामासाठी अॅडव्हान्सचा पहिला हप्ता जमा केला आहे. अंबुलगा – बु ता.निलंगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्याने दोन गळीत हंगाम अतिशय यशस्वीपणे पूर्ण केले असून तिसऱ्या गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे सन २०२५ – २६ हंगामाची तयारी कारखाना प्रशासनाकडून सुरू आहे. सध्या वाहतूक ठेकेदाराचे करार करणे सुरू असून कारखाना कार्यक्षेत्रातील व कारखाना बाहेरील ऊस वाहतूक वाहनाचे, बैलगाड्यांचे कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ज्या वाहतूक ठेकेदारांनी या कारखान्यासोबत करार केले आहेत अशा ठेकेदाराचे बँक खातेवर पहिला ऍडव्हान्स हप्ता जमा करण्यात आला आहे. येत्या हंगामासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा ही सक्षम करारबध्द प्रक्रिया पूर्ण झाली असून यामुळे यंदाच्या हंगामात उच्चांकी गाळप होईल. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे- पाटील यांनी दिली. अंबुलगा साखर कारखान्याने मागील हंगामात २०२४ – २५ मधील उस बिले, तोडणी-वाहतुकीची सर्व बिले वेळेत आदा केली आहेत. तसेच पुढील हंगाम २०२५-२६ ची स्थानिक व बाहेरील तोडणी वाहतुक यंत्रनणेची अॅडव्हान्स पहिला हप्ता वेळेवर दिल्यामुळे तोडणी मजूर, वाहतूकदार व शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर, मुख्य शेतकी अधिकारी, ऊस पुरवठा, चिफ अकै ांन्टट, चिफ इंजिनियर, चिफ केमिस्ट, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
