स्थानिक गुंडांचा बंदोबस्त केला पाहिजे – आ. विक्रमसिंह पाचपुते श्रीगोंदा तालुक्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले
स्थानिक गुंडांचा बंदोबस्त केला पाहिजे – आ. विक्रमसिंह पाचपुते
श्रीगोंदा तालुक्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यामध्ये नेहमीच दरोडा चोरी रस्तालुटी खून टोळीयुद्ध गोळीबार अशा घटना नेहमीच घडत असतात.आपल्या आपल्या भागामध्ये वचक व दबदबा निर्माण करणे यासाठी मोठ्या प्रमाणात गुन्हेगार नेहमी दहशत निर्माण करत असतात.व त्यातून अनेक वेळा गंभीर गुन्हे व घटना घडतात. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील युवक माऊली सतीश गव्हाणे वय 19 वर्ष त्याच्या शरीराच्या खांडोळी करून निर्घुण खून करण्यात आला या खुणाचा तपास तातडीने लागावा यासाठी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते स्वतः दोन दिवसांपूर्वी घटनास्थळी जाऊन प्रशासनास पोलीस विभागाला अलर्ट केले व अवघ्या दोनच दिवसात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा व बेलवंडी पोलिसांनी खुनाचा छडा लावला तसेच आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मुंबई येथे चालू असलेल्या अधिवेशनात लक्षवेधी लावत माननीय अध्यक्षांना प्रकरण किती गंभीर आहे हे सांगितले व लक्षवेधी च्या माध्यमातून मांडताना अध्यक्षांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर खुण्यांना सजा मिळावी यासाठी पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशा सुचना केल्या व विक्रमसिंह पाचपुते हे बोलताना म्हणाले स्थानिक गुंड हे सोशल मीडियाच्या माध्यमातून ऊहापोह करतात त्याचा परिणाम लहाण मुलांनवर होतो त्यामुळे त्यांना मारामारी व खुन किरकोळ वाटत आहे.
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या लक्षवेधीमुळे एक व त्या पेक्षा अधिक गुन्हे आरणाऱ्या आरोपी व गुंडावर श्रीगोंदा पोलीस स्टेशन व बेलवंडी पोलीस स्टेशन काय ॲक्शन घेणार याचे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
