सुपा गावात शिवजयंती उत्साहात साजरी
सुपा गावात शिवजयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांच्या वतीने सुपा बसस्थानक चौक येथे तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सुपा येथील जेष्ठ नागरिक रामदास बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले पत्रकार बांधव तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, अँब्युलन्स चालक, महावितरण चे वायरमन बंधु भगिनींचा तसेच वाहतूक पोलीस बांधवांचा सन्मान करण्यात आला यावेळी सुपा गावचे उपसरपंच दत्ता नाना पवार, कामगार आघाडीचे नेते कल्याण शहाणे, बाळासाहेब पवार, नितीन म्हस्के, अक्षय सुर्यवंशी, विजय पवार, प्रकाश पवार,शादिक भाई, अल्ताफ भाई, पञकार शरद रसाळ, विशाल फटागंडे,सुदाम दरेकर, फैजल पठाण, रोहित मेमाणे, अरुण वाळुंज थोरात बाळासाहेब तरटे, वायरमन,जरे,कडु, दिवटे यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
