म्हसणे फाटा फेज २ सुपा एमआयडीसी चौकात मनसे नेते रविश रासकर आणि मित्र परिवाराच्या वतीने शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी झाली.
म्हसणे फाटा फेज २ सुपा एमआयडीसी चौकात मनसे नेते रविश रासकर आणि मित्र परिवाराच्या वतीने शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी झाली.
प्रतिनिधी :- प्रतीक शेळके सुपा
दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती म्हसने फाटा एमआयडीसी चौकामध्ये साजरी होत असते.तसेच यावर्षीही मनसे नेते रविश रासकर आणि मित्रपरिवार च्या वतीने चौकात अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम पूजन करून आरतीला सुरुवात झाली आणि आरतीसाठी सर्व स्थानिक उद्योजक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. चौकामध्ये शिवरायांच्या आरतीसाठी सर्व शिवभक्त आणि स्थानिक उद्योजक हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि शिवजयंतीची आरती झाल्यानंतर मनसे नेते रविश रासकर यांनी सर्वांची आभार व्यक्त केले.