ताज्या घडामोडी

गव्हाणवाडी मध्ये घोडनदीच्या १७ कमानीच्या पुलावरती तीन गाड्यांचा विचित्र अपघात नवरदेवाच्या गाडीच्या समावेश

गव्हाणवाडी मध्ये घोडनदीच्या १७ कमानीच्या पुलावरती तीन गाड्यांचा विचित्र अपघात नवरदेवाच्या गाडीच्या समावेश

श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे

गव्हाणवाडी मध्ये घोडनदीच्या १७ कमानीच्या पुलावरती तीन गाड्यांचा विचित्र अपघात दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी साडे सात च्या दरम्यान्य झाला .सविस्तर मिळालेली माहिती अशी की इनोव्हा गाडी एम.एच. १४एच.डबलु 2227 ही गाडी व स्विफ्ट डिझायर गाडी एम.एच.१४.एच.डी.१५३२ या अहिल्यानगर वरून पुणे च्या दिशेने जात असताना एम.एच. १२एफ.झेड.४७४२ या माल घेऊन चाललेल्या भरधाव वेगान ट्रकने इनोव्हा गाडी व स्विफ्ट डिझायर गाडी यांना मागच्या बाजुने जोराची धडक दिल्या मुळे दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे .कार गाडीमध्ये नवरदेव नवरी हे जेजुरी देवस्थान ठिकाणी दर्शनासाठी जात होते . त्यावेळी हा विचित्र अपघात झाला . हा अपघात झाल्यावर पुणे नगर महामार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली.सदरील घटना समजतात बेलवंडी व शिरूर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी वाहतूक सुरूळीत केली व अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले सदरील घटनेची बेलवंडी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी गौरव मानिक धनवट राहणार भोसरी जिल्हा पुणे यानी टाटा कंपनी ट्रक एम.एच. १२ एफ.झेड. ४७४२ वरील चालक याच्यावर निष्काळजी पनानने गाडी चालवने अशा विविध कलमा आंतर्गत २८१,३२४,१३४,१८४,१७७ इत्यादी कलमा आंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे व सहाय्यक फौजदार मारुती कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पो.ना.गांगरडे हे करत आहे .

रस्ते विभागाच्या हलगजरीपानामुळे अनेक होतात अपघात !!

 पुणे नगर महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यामध्ये खड्डे पडले आहे व घोडनदी पुलावरती खडडे पडलेले आहे त्यामुळे वाहन चालकांचा गाडी चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे.या महा मार्गावरती अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक ,पांढऱ्या झेब्रा पट्टया ,साईट पट्टया ,डिव्हायडर वरती रंग छटा इत्यादी पुसट झाले आहेत व काही ठिकाणी नाहीत . रस्ते विभागाच्या हलगजरीपानामुळे अनेक अपघात होताना दिसत आहे.

पहा व्हीडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!