म्हसने येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी, विविध कार्यक्रमाचे आयोजन केले
म्हसने येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी, विविध कार्यक्रमाचे आयोजन केले
सुपा प्रतिनिधी – प्रतीक शेळके
म्हसने येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
म्हसने ग्रामस्थ यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले
पारनेर तालुक्यातील म्हसने येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला नमन व स्मरण करण्याच्या हेतूने जयंती साजरी करण्यात आली.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कल्याणजी काळे यांच्या पोवड्याच्या कार्यक्रम झाला तसेच 10 वी व 12 वी च्या परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व यावेळी आयोजकांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावातील ग्रामस्थ महिला वर्ग मोठा जनसमुदाय उपस्थित होता
