किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांचा मोरया शेअर मार्केट क्लासेस कडुन सन्मान
किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांचा मोरया शेअर मार्केट क्लासेस कडुन सन्मान
मोरया शेअर मार्केट क्लासेस आयोजित किल्ले बनवा स्पर्धा २०२४ या स्पर्धेत विजेत्यांचा सन्मान आयोजक प्रा. अरुण दिवटे आणि प्रा. वृषाली दिवटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
शिरूर प्रतिनिधी : –
शालेय जीवनात मुलांना महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असलेल्या गड किल्ल्यांचा इतिहास समजला जावा, या हेतुने प्रेरित होऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन मोरया शेअर मार्केट क्लासेसच्या वतीने ही स्पर्धा दिवाळीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेत २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. मुलांनी शिवरायांच्या गौरवशाली परंपरा असलेल्या गड किल्ल्यांच्या हुबेहुब प्रतिकृती बनवल्या शिवाय तसेच त्या किल्ल्यांविषयी माहिती सुद्धा व्हिडिओ च्या माध्यमातुन सादर केली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक आयुष आनंद कित्तुर, व्दितीय क्रमांक सूरज गणेश पोकळे आणि संमती बाळू साळवे, तृतीय क्रमांक मयंक गौरव काळे आणि शंभू सागर राऊत यांनी बनविलेल्या किल्यास मिळाला. तसेच उत्तेजनार्थ आराध्य सुनील निचित आणि मुंबई बाजार मित्रमंडळ यांना बक्षीस देण्यात आले .
मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा, मराठमोळी संस्कृती जतन केली जावी हा मुख्य उद्देश यातुन सफल झाला. प्रा. सुनिल निचित, प्रा. कविता निचित, प्रा. विलास निचित, डॉ. संदीप देविकर, यांनी किल्ल्यांचे परीक्षण करुन विजेत्यांचा ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक व रोख स्वरुपात बक्षिस देऊन सन्मान केला तसेच सदर बक्षीस वितरण कार्यक्रमास 60 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदविला.
