जिल्हास्तरीय उंच उडीत दिपाली निकम प्रथम. रायगव्हाण ग्रामस्थांकडून दिपालीचा सत्कार
जिल्हास्तरीय उंच उडीत दिपाली निकम प्रथम. रायगव्हाण ग्रामस्थांकडून दिपालीचा सत्कार
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
जिल्हा परिषद अहिल्यानगर (शिक्षण विभाग) आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक १४ व १५ फेब्रुवारी २०२५ रोजी नेवासा फाटा या ठिकाणी फार पडल्या. दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी .
झालेल्या लहान गट स्पर्धेतील उंच उडी या प्रकारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण येथील दिपाली काळू निकम या विद्यार्थिनींचा उंच उडीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला.जिल्ह्यात उंच उडीत प्रथम क्रमांक आल्यामुळे दिपालीचा सत्कार सर्व स्तरातून होत आहे.श्रीगोंदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी श्री.सत्यजित मच्छिंद्र साहेब, विस्तार अधिकारी श्रीम.वाजे मॅडम, पिंप्री केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीम. साबळे मॅडम शाळेचे मुख्याध्यापक कानडे सर सर्व शिक्षक यांनी दिपालीचा सत्कार केला.रायगव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अविनाश खोसे, गावातील उदयोजक श्री.अनिल पठारे, शिक्षण प्रेमी श्री. संतोष वीर, श्री.आबा हार्दे इ.ग्रामस्तांनी दिपाली समवेत दिपालीचे .
आई वडील, शाळेतील सर्व शिक्षक श्री. कानडे सर, श्री. कोकाटे सर, श्री. गाडेकर सर, श्रीम.गहाणडुले
मॅडम, श्रीम. म्हस्के मॅडम, यांचा सत्कार केला. त्याच बरोबर दिपालीला सत्कारानिमित्त आर्थिक मदतही देण्यात आली.
