क्रिडाताज्या घडामोडी

आजच्या तरुणाईची जीवनशैली बदल्यामुळे आयुष्यमान कमी झाले :- प्राचार्य डॉ. संभाजी पठारे

आजच्या तरुणाईची जीवनशैली बदल्यामुळे आयुष्यमान कमी झाले :- प्राचार्य डॉ. संभाजी पठारे

प्रतिनिधी – अमोल बोरगे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी या उपक्रमांतर्गत मौजे देवदैठण येथील विशेष हिवाळी शिबिरामध्ये प्राचार्य डॉ. संभाजी पठारे यांनी राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांचे योगदान या विषयावर व्याख्यान दिले.
यावेळी डॉ संभाजी पठारे सर यांनी सांगितले की, आजचा युवक हा ध्येयाने प्रेरित असला पाहिजे पण आपला युवक मोबाईल मध्ये हरवून बसला आहे. आजच्या युवकांना सर्व भौतिक सुविधा मिळाल्यामुळे तो आळशी बनत चालला आहे. यावेळी सरांनी इस्त्राईल देशाविषयी त्यांचा अनुभव सांगताना सांगितले की क्षेत्रफळाने खूप कमी असलेला देश आज खूप प्रगती करत आहे कारण तेथील युवकांनी शेतीमध्ये आणि तंत्रज्ञानात अव्वल स्थान प्राप्त केले आहेत. युवकांचे योगदान याविषयी बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन पट विद्यार्थ्यांसमोर मांडला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. अशोक काकडे यांनी केले. यावेळी डॉ. सिद्धार्थ कांबळे, डॉ. रेणुका करपे, प्रा. दिलीप टोणगे, प्रा. अमोल पितळे. प्रा. प्रवीण घुंबरे, संजय भोकटे, खोडके अविनाश उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी रोडे तसेच आभार विकास कापुरे यांने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!