नगर दौंड महामार्गावर भिषण अपघात दुचाकी स्वार जागेवर ठार
नगर दौंड महामार्गावर भिषण अपघात दुचाकी स्वार जागेवर ठार
सविस्तर वृत्तांत – प्राध्यापक केशव कातोरे ( संपादक )
नगर दौंड महामार्गावर बेलवंडी फाट्यानजीक MH14GD9851 या क्रमांकाच्या चा चारचाकी कार गाडी अहिल्यानरच्या दिशेने चालली होती व नंबर नसलेले बजाज कंपनीची दुचाकी पल्सर जी दौंड च्या दिशेने चालली होती यांच्यात भिषण अपघात झाला.या अपघातात दुचाकी स्वार साई शरद कोहक राहणार घारगाव तालुका श्रीगोंदा यांचा य जागीच मृत्यू झाला साई कोहक हा इंदिरा गांधी पाॅलिटेक्निक काॅलेजचा प्रथम वर्ष सिव्हिल विभागाचा विद्यार्थी होता तो दुचाकीवरून काॅलेजला चालल्याचे समजते व चार चाकी वाहणातुन सरकारी वैद्यकीय अधिकारी प्रवास करत असावेत असे प्रथमदर्शनी दिसुन आले.चार चाकी वाहणात एक ओळखपञ सापडले त्यावर संजय पांडुरंग शिंदे वाहन चालक ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा असा स्पष्ट उल्लेख होता.दोन्ही वाहनांचा वेग त्यात दुचाकी वाहनाचा वेग अती जास्त होता असे अपघात ज्यांनी समोर बघितला त्यांच्यांत चर्चा होती . या अपघातस्थळी बेलवंडी पोलिसानी तातडीने धाव घेत वाहतुक सुरळीत करत योग्य ती कायदेशीर कारवाई पुर्ण केली तसेच इंदिरा गांधी पाॅलिटेक्निक काॅलेजच्या प्राध्यापक वर्गांनी हि तातडीने घटनास्थळी धाव घेतली या अपघात जागीच मृत्यू पावलेल्या साई शरद कोहक यांच्या घरची परिस्थिती अतिशय जमतेम असुन आईचा तो आधार होता काळाने तो ओढुन नेल्याने घारगाव परीसरात शोककळा पसरली आहे.
