श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी (पिंपळगाव पिसा) गावात दशक्रियेचा कार्यक्रम भर पावसात पार पडला.
श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी (पिंपळगाव पिसा) गावात दशक्रियेचा कार्यक्रम भर पावसात पार पडला.
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील खरातवाडी या गावांमध्ये दशक्रियेचा कार्यक्रम भर पावसात पार पडला दशक्रिया साठी कसल्याही प्रकारची बसण्याची सुविधा नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या .
१९९३ साली खरातवाडी या गावास महसुली गावाचा दर्जा प्राप्त झाला परंतु विकासाची कुठलीही दिशा या गावाला लाभली नसल्याने अतिदुर्गम भागातील लोकांच्या जीवनाप्रमाने गावातील नागरिकांची हाल होत आहेत. संत तुळशीदास महाराज संजीवन समाधी मंदिराच्या पवित्र पावन भूमीतील नदीपात्रात होणाऱ्या दशक्रिया विधीच्या ठिकाणी कार्यक्रमास बसण्यासाठी कुठलाही पत्राशेड ,प्लेविन ब्लॉक , अथवा सभामंडप नसल्याने भर पावसात, चिखलामध्ये आज दशक्रिया विधी पार पडला. संततधार पडणाऱ्या पावसात दुःखांकीत नागरिक, पाहूणे मंडळी, तसेच राजकीय पुढाऱ्यांना पावसात भिजून, चिखलात बसावे लागल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याने लोकप्रतिनिधी, शासन आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत जनतेतून नाराजीचा सुर उमठला असून पावसाळ्यात दुःखद विधिंना बसण्यासाठी गैरसोय निर्माण होत असल्याने प्रचंड मानसिक त्रास गावातील नागरिकांना पाहूणे मंडळींना सहन करावा लागत आहे.
