आवकाळी पावसाने ढवळगाव परिसरातील जनजीवन विस्कळित
आवकाळी पावसाने ढवळगाव परिसरातील जनजीवन विस्कळित
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे, ढवळगाव, म्हसे, देवदैठण, हिंगणी दु.,आरणगाव, येवती, राजापुर, माठ, पिंपरी कोलंदर, रायगव्हाण, गव्हणवाडी, कोंडेगव्हाण निबंवी तसेच या परिसरामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे.शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, सतत संततधार पाऊस पडत असल्यामुळे नेहमी रोजंदारीने , कंपनीमाध्ये व इतर ठिकाणी कामाला जाणाऱ्या नागरिकांची मात्र मोठी पंचायत झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही.
श्रीगोंदा तालुक्यामध्ये मे महिन्यातील अलिकडच्या काही वर्षांत सर्वाधिक अवकाळी पावसाची नोंद झाली असून यामुळे हजारो शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.तसेच शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागती व पेरण्या या लांबणीवर पडल्या आहेत. अनेक ठिकाणी वादळामुळे नागरिकांच्या पूशधनासह घरांचे आणि कांदा चाळीचे नुकसान झाले आहे.यासह मोठ्या संख्येने उन्हाळी कांदा व फळबागांचे नुकसान झाले आहेतच परंतु मोठ्या प्रमाणात शेतामधील भाजीपाला , तरकारी, फळे यांची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना पावसामुळे बाजारात विक्रीसाठी शक्य होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
तसेच आठ दिवसांपासून भागात सुरू असणारा अवकाळीचा कहर संपण्याची चिन्हे मे महिन्याच्या आखेर पर्यंत काही दिसत नाहीत.
पावसाची सरासरी आकडेवारी
बेलवंडी 270 मिमी
पेडगाव 282 मिमी
चिंबळा 201 मिमी
देवदैठण 143 मिमी
कोळगाव 320 मिमी
लोणी व्यंकनाथ 189 मिमी
भानगाव 216 मिमी
श्रीगोंदा 234 मिमी
काष्टी 231 मिमी
मांडवगण 269 मिमी
