लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) लेबर सेल प्रकोष्ट राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्ली येथे संपन्न.
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) लेबर सेल प्रकोष्ट राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्ली येथे संपन्न.
लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) साईट्रीय कार्यकारिणी वेठक मुहस्पतिवार, 24 जुलाई 2025
शिक्रापूर प्रतिनिधी शरद टेमगिरे शिक्रापूर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) लेबर सेल प्रकोष्ट
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कॉन्स्टिट्यूशन क्लब रफी मार्ग नवी दिल्ली येथे पार पडली या वेळेस भारतातील 28 राज्यातील प्रदेश अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष भारत सरकार कॅबिनेट मंत्री सांसद रत्न युवकांचे हृदय सम्राट आदरणीय चिराग पासवानजी राष्ट्रीय प्रधान महासचिव जनाब अब्दुल खालिद जी जमुई चे लोकप्रिय सांसद बिहारचे प्रभारी आदरणीयअरुण भारतीजी खगाडिया जिल्ह्याचे सांसद आदरणीय राजेश बर्मा जी समस्तीपुर सांसद श्रीमती संमभवी चौधरी जी वैशाली जिल्हा सांसद श्रीमती विना देवीजी लेबर सेल राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अध्यक्ष राजेश पासवान जी प्रधान महासचिव विजयकुमार जी वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रदेव पासवान जी राष्ट्रीय राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रवक्ता सुंदर चौधरी जी व राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष भारत सरकार कॅबिनेट मंत्री आदरणीय चिराग पासवान जी यांनी भारतातून आलेल्या सर्व प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या कार्यकारणीला संबोधित करताना सांगितले की आपला तालुका जिल्हा राज्य सक्षम करायचे असेल तर लेबर सेलच्या माध्यमातून संघटित असंघटित कामगार यांना बरोबर घेऊन आपले संघटन मजबूत करून तसेच आपली बूथ कमिटी मजबूत करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागामध्ये काम करण्याचे सुचित करण्यात आले व संघटन मजबूत करण्यास सांगितले व येणाऱ्या भविष्या काळामध्ये आपण आपल्या राज्यामध्ये कामगार मेळावे घेऊन संघटित असंघटित कामगारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मदत करावी असे सूचित करण्यात आले तसेच लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)लेबर सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. शरद टेमगिरे यांनी दिल्ली येथील कार्यकारणी बैठकीत आपल्या भाषणातून संबोधित करत असताना महाराष्ट्रामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये संघटन काम करत असून महाराष्ट्राच्या कार्यकारणी मध्ये 15 सदस्यांची कार्यकारणी तयार केलेली असून येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या जिल्ह्यांचे संघटन उभारून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये लेबर सेलचे काम जोमाने चालू करून संघटित असंघटित बांधकाम कामगारांना मजूर अड्डा यांना लेबर कार्ड काढून देऊन त्यांना येणाऱ्या अडचणीला मदत करत असून इथून पुढे असेच सहकार्य लेबर सेलच्या वतीने सर्व कामगारांना बंधू-भगिनींना केले जाईल असे जाहीर केले राष्ट्रीय अध्यक्ष राजेश पासवान जी उपाध्यक्ष सुंदर चौधरी जी प्रधान महासचिव विजयकुमार जी व राष्ट्रीय कार्यकारणी यांच्या वतीने भारतातून आलेल्या सर्व राज्यातील अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी यांचे जाहीर आभार मानले
त्यावेळेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्यामराव लांडे पाटील जनरल सेक्रेटरी प्रतीक शेळके लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम सूर्यवंशी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील कोकरे उपस्थित होते.
