अमोल बोरगे यांची डिजिटल मीडिया श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी निवड
अमोल बोरगे यांची डिजिटल मीडिया श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी निवड
श्रीगोंदा प्रतिनिधी – आदेश उबाळे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजिटल मीडिया विभाग यांच्या वतीने श्री. पत्रकार अमोल किसन बोरगे (रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर ) यांची श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले असून, ही नियुक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे ,प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे ,यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
अमोल बोरगे हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामीण पत्रकारितेमध्ये सक्रिय असून, त्यांच्या कार्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत त्यांना संघटनेत जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडीबद्दल तालुक्यातील पत्रकार व विविध सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते ,डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड ,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पिटर रणसिंग ,माजी तालुकाध्यक्ष जेष्ठ पत्रकार अंकुश शिंदे ,डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारणी सदस्य सर्जेराव साळवे ,पारनेर तालुका अध्यक्ष डिजिटल मीडिया राम तांबे ,श्रीनिवास शिंदे ,मनोज रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
