ओंकार कोहकडे,यश औटी यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड
ओंकार कोहकडे,यश औटी यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील अत्यंत सामान्य व शेतकरी कुटुंबातील ओंकार विष्णू कोहकडे,यश संदीप औटी या दोघांची भारतीय सैन्यामध्ये २१ मार्च रोजी निवड झाली त्यांची परीक्षा एप्रिल मध्ये तसेच वैद्यकीय व मैदानी चाचणी नोव्हेंबर २०२४ मध्ये यशस्वीरित्या पार पडली होती.त्यांना सैन्य दलात भरतीसाठी श्लोक ॲकडमी शिरूर चे श्री.अविनाश परांडे सर ,एवरेस्ट कोचिंग क्लासेस शिरूर चे चेतन साळवे सर व मैदानी मार्गदर्शन श्रीनाथ करिअर अकॅडमी शिरूर चे पिंटु सर यांचे मार्गदर्शन लाभले.
ओंकार कोहकडे व यश औटी यांची सैन्य दलामध्ये निवड झाल्यामुळे ढवळगाव ग्रामस्थांनी सन्मान केला यावेळी युवा नेते खुशाल शिंदे,मा. सरपंच विजय शिंदे ,मेजर बापु ढवळे ,मेजर तुषार तांबे ,मा.उपसरपंच राहुल बोरगे ,कृषी उत्पन्न बाजार समिती मा.संचालक कैलास ढवळे,मा.ग्रा.पं.सदस्य अमोल बोरगे ,पवन बोरगे, दिपक शिंदे ,विशाल बनकर ,बाळु शिंदे ,आतुल वाळुंज ,दिलखुश सावंत ,नवनाथ वाळुंज,संतोष शिंदे ,नवनाथ ढवळे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
