ताज्या घडामोडी

विकासाची काय व्याख्या आहे हे विरोधकांनी सांगावी – प्रतिभा पाचपुते

विकासाची काय व्याख्या आहे हे विरोधकांनी सांगावी – प्रतिभा पाचपुते

श्रीगोंदा प्रतिनिधी : अमोल बोरगे ( मुख्यसंपादक )

        श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथे सौ. प्रतिभा पाचपुते म्हणाल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात. शेतीसाठी मुबलक पाणी ‘ रस्ते,विज , शेती च्या सिंचनाच्या माध्यमातून उस उत्पादक वाढला एकेकाळी तालुक्याच्या बाहेरून उस आयात करावा लागत असे , आज उस बाहेरच्या साखर कारखान्याला दिला जातो . हा विकास दिसत नाही का ? दुग्ध व्यवसायात वाढ , पूर्वीच्या काळात कधीतरी दुधाचा चहा मिळत होता . सर्वसामान्य जनतेचे रहाणीमान उंचावले शिक्षण क्षेत्रात प्रगती . या सारख्या गोष्टींबर सातत्याने लक्ष केंद्रीत करून सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी नेहमी प्रयत्न केले . परंतु विरोधकांना हा विकास झालेला दिसत नसून डोळ्यावर पट्टी बांधली आहे का ? असा सवालही उपस्थित केला . .
महायुतीच्या काळात अनेक विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेसाठी आणल्या . भविष्यातही युतीच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागतील जो तालुक्याचा विकास झाला तो पाचपुते यांच्यामुळेच झाला असल्याचे बोलले . पाचपुते आजारी असताना विक्रम यानी तालुक्यासाठी सतराशे कोटी रुपये निधी आणला . हे सर्व तुम्हा जनतेच्या पाठिब्यांमुळेच .
मा.सरपंच रविंद्र शिंदे यांनी प्रास्ताविक करताना पाचपुते यांच्या माध्यमातून ढवळगाव मधे जि.प प्राथमिक शाळा दोन वर्गखोल्या ,ग्रामपंचायत कार्यालय , सिमेंट काँक्रिट रोड ( गाव अंतर्गत )ज लजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना , खंडोबा मंदिर सुशोभीकरण ब्लॉक बसवणे , मुस्लिम कब्रस्तांन सुशोभीकरण ब्लॉक बसवणे , दलीत वस्ती मध्ये सिमेंट काँक्रिट रोड अनेक विकास कामे केले आहे त्या कामांचे कौतुक करत विक्रम पाचपुते यांना मतदान करून उर्वरित विकास कामे त्यांच्या माध्यमातून करुयात असा आशावाद व्यक्त केला .
आर .टी .शिंदे, रोहित गायकवाड युवा भाजपा मोर्चा तालुकाध्यक्ष , मिरा शिंदे जिल्हा महिलाध्यक्ष शिवसेना ,माऊली हिरवे आदिनीं मनोगते व्यक्त केली .
यावेळी देवयानी शिंदे , रुपाली पाटील ( पाचपुते) , सुप्रिया सप्रे ,सारिका शिंदे ,अनिता वाळुंज , नंदा शिंदे, संतोष गुंड मा सरपंच मढेवडगाव , गौतम वाळुंज,देवयानी शिंदे , रुपाली पाटील , शुभांगी सप्रे , घोडेकर ताई ,रविंद्र शिंदे , बाबासाहेब शिंदे , आनंदा शिंदे , अंबर शिंदे , राहुल बोरगे,गणेश शिंदे शिवाजी शिंदे ,अनिल वाळुंज विशाल बनकर , काशिनाथ शिंदे , अजय वाळुंज , अमित वाळुंज , डॉ.राजेंद्र तापकीर , भाऊसाहेब शिंदे , शिवाजी लोंढे त्रिदल आजी माजी संघटना , तुकाराम बोरगे , इनुस पठण , नाना पठाण , हुसेन पठाण , अंकुश तांबे , अरुण जांभळकर , सुनिल डोंगरे , सुरेश शिंदे , महेश चव्हाण , दतु ढवळे , किसन गाडेकर , आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!