भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारसभेत मानिवली गावच्या लाडक्या बहिणीने गाणे गाऊन उपस्थितांची जिंकली मने !
भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारसभेत मानिवली गावच्या लाडक्या बहिणीने गाणे गाऊन उपस्थितांची जिंकली मने!
कल्याण प्रतिनिधी (संजय कांबळे) –
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या कल्याण ग्रामीण परिसरातील प्रचार सभेत मानिवली गावच्या श्रीमती बारकुबाई हरिश्चंद्र माळी या लाडक्या बहिणीने आमदार कथोरे यांच्या वर गाणं गाऊन स्वतः सह इतरांना ही थिरकायला लावणा-या बहिणीने श्री कथोरे यांच्या सह उपस्थित सर्वांचीच मने जिंकली,
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मुरबाड विधानसभा निवडणुकीत इतर अनेक उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजपाचे उमेदवार किसन कथोरे व महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्यात होणार आहे. दोघांचा ही प्रचाराचा झंझावात सुरू आहे, प्रत्येक गावात दोघांना ही कमी अधिक प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. पक्षीय विचार केला तर या मतदारसंघात भाजपावर लोकांचा भयानक राग आहे, उलट महाविकास आघाडीला सहानुभूती मिळत आहे. पण व्यक्ती म्हणून तुलना केली तर विद्यमान आमदार किसन कथोरे हे सरस ठरत आहेत, त्या मानाने सुभाष पवार मागे पडत आहेत.
अशा या परिस्थितीत महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांचे कल्याण तालुक्यातील मानिवली गावात आगमन होताच त्यांचेवर जेसीबीतून पुष्षवर्षाव करण्यात आला. गावातील मुख्य रस्त्यावरुन त्यांची प्रचार रँली निघून मंदिरात जाऊन मारुतीचे दर्शन घेऊन परत आल्यावर गावातील चौकात, गावच्या, सरपंच, सदस्य महिलांनी त्यांचे औक्षण केले, यावेळी बारकुबाई हरिश्चंद्र माळी या लाडक्या बहिणीने उमेदवार कथोरे यांच्यावर गाणं गाऊन उपस्थित सर्वांनाच ठेका धरायला लावला.यावेळी हे गाणे ऐकून आपल्या डोळ्याचे पारणं फिटल्याची प्रतिक्रिया श्री कथोरे यांनी व्यक्त केली. या प्रचार रँलीत आजुबाजुच्या गावातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, सहभागी झाले होते, यावेळी मानिवली गावातून आमदार कथोरे यांना चांगला प्रतिसाद मिळत होता.
