ताज्या घडामोडी

म्हसने फाटा येथे श्री समर्थ मल्टी सर्विसेसचा ऑनलाइन सीएनजी सुविधा ग्राहकांच्या सेवेत दाखल सीएनजी वाहन चालक मालकांची रांगेत उभे राहण्यापासून होणार मुक्तता

म्हसने फाटा येथे श्री समर्थ मल्टी सर्विसेसचा ऑनलाइन सीएनजी सुविधा ग्राहकांच्या सेवेत दाखल

सीएनजी वाहन चालक मालकांची रांगेत उभे राहण्यापासून होणार मुक्तता

पारनेर प्रतिनिधी : प्रतिक शेळके 

             म्हसणे फाटा येथील कैलास गाडीलकर यांच्या भारत पेट्रोलियमचे श्री समर्थ मल्टी सर्विसेस या पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या सेवेसाठी प्रथमच सर्व सोयी सुविधांयुक्त सी.एन.जी. ची ऑनलाईन सुविधा सुरु झाली आहे.या पुर्वी जिल्हयातील प्रथम सी.एन.जी.पंपावर ऑफलाईन पद्धतीने सी.एन.जी.सेवा सुरु होती.परंतु वाढत्या सी.एन.जी. वाहनांमुळे व कमी प्रेशरच्या तसेच पुरवठ्याच्या तक्रारी मुळे सीएनजी वाहन मालक चालक व वाहक ग्राहकांची होणार्‍या ससेहोलपटी मुळे लांबची लांब रांगेत उभे राहावे लागत होते. ग्राहकांची मागणी ऑनलाईन सुविधेची होती. व त्यांचा किमती वेळ यामुळे वाया जात होता या सर्व गोष्टींचा विचार करत आपण ग्राहकांना या सर्व समस्येतून कसे मुक्त करता येईल याचा विचार करत या पंपावर बी.पी.सी.एल. कंपनीच्या माध्यमातून जिल्हयातील सर्वात मोठा किर्लोस्कर कंपनीचा कॉम्प्रेसर बसविन्यात आलेला आहे. तसेच ग्राहकांना गॅस भरण्यासाठी प्रतिक्षा करावी लागू नये म्हणून आठ नोझल बसविण्यात आले आहे. त्यामुळे एकाच वेळी 8 वाहने सि एन जी गॅस भरु शकतील ,तसेच मोठ्या बस व ट्रक यामध्ये सुद्धा स्वतंत्र सी.एन.जी. भरण्याची सुविधा या पेट्रोल पंपावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. 

         सदरची सेवा ही 24 तास सुरु राहणार आसुन. त्यामुळे लांब रांगा लावण्याची वेळ ग्राहकांवर येणार नाही. तसेच मोठा कॉम्प्रेसर असल्यामुळे फुल प्रेशरने गॅस भरला जाणार आहे. त्यामुळे रांगा लावून गॅस भरण्याची प्रतिक्षा आता संपलेली आसुन.या पुर्वीही या पेट्रोल व सि एन जी पंपाची गुणवत्ता व ग्राहक सेवेची दखल घेत ,महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यस्तरीय तसेच अहमदनगर टेरीटोरीचे अनेक पुरस्कार मिळविन्यात कैलास गाडीलकर हे यशस्वी झालेले आहेत.

            ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी भारत पेट्रोलियमची गुणवत्ता अबाधित ठेवत व्यवसाय करणारे युवा उद्योजक कैलास गाडीलकर यांची सर्वोत्तम ग्राहक सेवेची दखल भारत पेट्रोलियम ने घेत CNG रिटेल आउटलेट ,सी.एन.जी. चॅम्प महाराष्ट्र आणि गोवा राज्य ,सर्वोच्च CNG मध्ये विक्री किरकोळ आउटलेट , टेरीटोरी चॅम्पियन ,बेस्ट रिटेल आऊटलेट मॅन्युयल लॉयल्टी प्रोग्राम,एच.एस.डी. चॅम्पियन अहमदनगर टेरीटोरी या पेट्रोलियम क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे .

       या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून श्रीगोंदा येथील उदयोजक तसेच माऊली एन्टरप्रायजेसचे संचालक ,श्री.चंद्रकांत जठार,भारत पेट्रोलियमचे,श्री.सुधीर कनाला (भारत पेट्रोलियमचे टेरीटोरी मॅनेजर ) (रिटेल) ,मनोजकुमार जाधव टेरीटोरी मॅनेजर (गॅस) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . यावेळी भारत पेट्रोलियमचे इतर अधिकारी श्री.सईद उल खैर , श्री . तरुण गर्ग ,अनिश मुलतक, अमित कुमार राय , पंपाचे डिलर श्री .कैलास गाडीलकर,सौ.शिल्पा गाडीलकर ,पंपाचे मॅनेजर श्री .आवेज सय्यद, उद्योजक श्री.बाळासाहेब भाऊ गाडीलकर ,ज्येष्ठ नागरिक श्री.बाळासाहेब बोधलाजी गाडीलकर (गुरुजी) श्री.संतोष तरटे (मेजर) आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!