बेलवंडी पोलीस स्टेशन व सीआरपीएफ.डी /१०७ चे पथ संचलन
बेलवंडी पोलीस स्टेशन व सीआरपीएफ.डी /१०७ चे पथ संचलन
श्रीगोंदा प्रतिनिधी – ( अमोल बोरगे / मुख्यसंपादक )
सध्या होऊ असलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यसह प्रत्येक तालुक्यामध्ये गावा-गावा मध्ये कोणत्याही प्रकारची शांतता भंग होऊ नये त्यासाठी कुठेही दंगल गैरकृत्य इत्यादी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात स्थानिक पोलिसांसह इतर सैनिक तुकड्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे .त्याच अनुषंगाने श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या हद्दीतील संपूर्ण कार्यक्षेत्रामधील गावांमध्ये सीआरपीएफ.डी /१०७ या सैन्यांच्या तुकडीने हातामध्ये रायफल घेऊन बेलवंडी,उक्कडगाव, ढवळगाव, देवदैठण , गव्हाणवाडी तसेच संवेदनशील असलेल्या सर्व गावांमध्ये जाऊन बेलवंडी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी व सीआरपीएफ.डी /१०७ मधील सर्व पोलीस कर्मचारी व सैनिकांनी रूट मार्च काढून पथसंचलन केले. त्यामुळे परिसरातील समाजामधे तेढ निर्माण करणारे व आफवा पसरवणारे तसेच गैर कृत्य करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर मोठी दहशत निर्माण झाली आहे.
यावेळी हे पदसंचलन करण्यासाठी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे ,उपनिरीक्षक मारुती कोळपे ,तसेच इतर कर्मचारी व सीआरपीएफ.डी /१०७ बल गटाचे असिस्टेंड कमांडेड नंदि बाबु ,इन्स्पेक्टर राजेश कुमार , अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे रूट मार्च पथ संचलन करण्यात आले.
