पाडळी दर्या घाट धोकादायक , भीषण अपघाताचा धोका . रस्त्यावर ही खड्ड्यांचे साम्राज्य .
पाडळी दर्या घाट धोकादायक , भीषण अपघाताचा धोका . रस्त्यावर ही खड्ड्यांचे साम्राज्य .
पाडळी दर्या :- प्रतिनिधी : सुदाम दरेकर पारनेर :-
घाटावरील पठार भागातील व घाटाखालील गावे जोडण्यासाठी पाडळी दर्या च्या घाटाचा दळण वळणाच्या दृष्टीने खूप वापर केला जातो , पण या घाटाच्या मध्यभागी गेल्या वर्षी झालेल्या पावसाने रस्त्याचा कठडा वाहून गेला व डांबरी रस्ता ही तुटल्याने वाहन चालकाच्या लक्षात न आल्यास मोठा अपघात होऊन मोठी जीवित हानी होऊ शकते , पण गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही .
देवीभोयरे फाटा ते पाडळी दर्या , पिंपरी पठार मार्गे पिंपळगाव रोठा फाट्या पर्यंत चा १२ किलो मीटरचा रस्ता म्हणजे खड्ड्यांचे साम्राज्यच . या रस्त्याने दुचाकी वा चार चाकी वाहने चालविणे, अतिशय जीवावर उदार होऊन प्रवास करणे होय . पठार वरील गावांना जाण्यासाठी व घाटांखालील गावांना येण्यासाठी पाडळी दर्या रस्ता व घाटाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो . साधारणतः २००२ साली दिवंगत आमदार वसंतराव झावरे पाटील यांनी आमदार निधीतून या १२ किलोमीटर च्या रस्त्याचे डांबरीकरण करून दिले होते . त्यानंतर च्या आमदारांनी फक्त एक वा दोन किलोमीटर पर्यंतचा रस्त्या चे डांबरीकरण केले , बाकी आहे तसाच . त्यानंतर च्या राजकीय नेत्यांकडे ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी करून ही त्यांनी दुर्लक्ष केले , निवडणूका आल्या की , फक्त आश्वासनाचे गाजर दाखविले जाते , ग्रामस्थ ही त्याला भुलतात , पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती असते . रस्ता डांबरीकरण झाल्यानंतर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेती कामांसाठी रस्ता खोदला , पण त्याची वेळीच डागडुजी न झाल्याने, त्यानंतर या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले . या मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो . शासन रस्त्यांच्या कामासाठी एकदाच निधी मंजूर करतात . पुन्हा दुरुस्तीसाठी फार मोठी प्रतिक्षा करावी लागते . या रस्त्याच्या दोन्ही बाजू ने पावसाचे पाणी जाण्यासाठी गटारी व छोटे पुल करणे आवश्यक आहे , पण ते नसल्याने पावसाचे पाणी सरळ रस्त्यावर येते , परिणामी रस्ता या अतिरिक्त पाण्याने वाहून गेल्याने अजूनच रस्त्याची दुर्देशा झाली आहे .
