श्रीगोंदा मध्ये बांगलादेशी महिला पकडल्या ,दहशतवाद विरोधी पथकाने केली कारवाई
श्रीगोंदा मध्ये बांगलादेशी महिला पकडल्या ,दहशतवाद विरोधी पथकाने केली कारवाई
श्रीगोंदा (प्रतिनिधी )- अमोल बोरगे
तालुक्यातील बनपिंप्री मधील होटेल प्रशांत मध्ये वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी घुसखोर महिलांना दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पारपत्र नियम कलमासह परकीय नागरिक कायद्यानुसार श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाचे सहाययक पोलीस निरिक्षक दत्तात्रय नलावडे यांच्या पथकाने तालुक्यातील बनपिंप्री शिवारातील सोलापुर रोडवर एका हॉटेल मध्ये बांगलादेशी महिला हया कोणत्याही वैध्य कागदपत्रांशिवाय वास्तव्यास आहेत. त्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशन चे स. पो. निरिक्षक गणेश अहिरे,, स।फौ भगवान गांगर्डे, पो कॉ.प्रमिला उबाळे, पो.शिपाई योगेश भापकर, होमगार्ड विशाल गोरखे, महिला होमगार्ड दिपाली मोटे सह दहशतवाद विरोधी पथक, नाशिक युनिट चे स पो नि दत्तात्रेय नलावडे, पो उप निरिक्षक सुखदेव मुरकुटे, सफौ राकेश खेडकर, पो हवालदार अनिल गोरे यांनी पंचासह छापा टाकला
. हॉटेल न्यु प्रशांत हॉटेल मध्ये पहिल्या मजल्यावर पाहणी केली असता सदर ठिकाणी 4 महिला मिळुन आल्या. यात . मुरसनिला अख्तर सफिउर सिकदर, वय 20 वर्ष मुळ रा. पकोरीया, खासीयल, नुरेल, उप जिल्हा खलिया, बांग्लादेश, बदलेले नाव- जुई जियारेल मंडल ,. रोमाना अख्तर रुमी, वय 20 वर्ष मुळ रा. हिदीया, वॉर्ड नं 06, अभय नगर, जैसोर, खुलना, बांग्लादेश, बदलेले नाव- मिता आकाश शिंदे ,. सानिया रॉबीउल इस्लाम खान, वय 20 वर्ष मुळ रा. बांग्लादेश, (पुर्ण पत्ता सांगता येत नाही) बदलेले नाव मिम मंडल ,. सानिफा अबेद अली खान, वय 20 वर्ष मुळ रा. बांग्लादेश, (पुर्ण पत्ता सांगता येत नाही) बदलेले नाव सानिफा जाहिद मंडल ह्या चार माहिला . न्यू प्रशांत हॉटेल, अहिल्यानगर सोलापुर रोड, ता मश्रीगोंदा असे सांगीतले. तेंव्हा त्यांना पंचासमक्ष आपण सर्व कोणत्या देशाचे नागरीक आहेत याबाबत विचारणा केली असता ते मुळचे बांग्लादेशी नागरीक असुन बेरोजगारीला कंटाळून भारतात आल्या असल्याचे या महिलांनी सांगितले.कंटाळून कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय व मुलकी अधिकारी यांची परवानगी न घेता घुसखोरीच्या मागांव भारतात प्रवेश केला व हॉटेल न्यू प्रशांत येथे काम करुन तेथेच राहत असलेबाबत सांगीतले.त्याच्याकडे रेडमी,ओपो मोबाईल ,आधार कार्ड, पॅन कार्ड, युनियन बँक डिबीट कार्ड,एन।एक्स जी आणि आयफोन, हवाई कंपनी मोबाईल असे साहित्य मिळाले.
चारही महिलांनसोबत त्यांचे बांग्लादेशाकडील कागदपत्रे आहेत काय याबाबत विचारणा केली असता त्यांनी आमचेकडे कुठलेही बांग्लादेशी कागदपत्र नसल्याचे सांगीतले. तसेच बांग्लादेश येथील त्यांचे नातेवाईक यांचेसोबत बोलण्याकरीता मोबाईल मधील IMO APP चा वापरत असुन त्यात आमच्या नातेवाईकाचे वांग्लादेशातील नातेवाईंकाचे IMO ID आहेत. तसेच त्यांच्या मोबाईल मधील कॉन्टेक्ट लिस्ट मध्ये बांग्लादेश येथील कंन्ट्री कोड +880 चे मोबाईल क्रमांक मिळुन आले आहे. त्यांनतर आम्ही पोलीस व पंचानी त्यांना भारतात येण्यासाठी लागणारा अधिकृत पासपोर्ट व व्हिसा आहे काय याबाबत विचारपुस करता त्यांनी त्यांचेकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याचे त्यांनी सांगीतले. त्यावरुन वरील चारही महिला हे घुसखोर बांग्लादेशी असल्याने त्याच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घुसखोर करनाऱ्या या माहिला कश्या पध्दतीने घुसखोरी केली.त्याना आश्रय कुणी दिला ,आधार कार्ड,पॅन कार्ड, बँक डिबीट कसे मिळले हे पुढील तपासात निष्पन्न होणार असल्याचे तपासी अधिकारी यांनी सांगितले.
