घुगलवडगाव सेवा संस्थेच्या व्हा. चेअरमन पदी रामदास दांगडे यांची बिनविरोध निवड
घुगलवडगाव सेवा संस्थेच्या व्हा. चेअरमन पदी रामदास दांगडे यांची बिनविरोध निवड
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा समजल्या जाणाऱ्या घुगलवडगाव सेवा संस्थेच्या व्हा. चेअरमन पदी रामदास दशरथ दांगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.दरम्यान विद्यमान व्हा. चेअरमन सतीश किसन दांगडे यांनी राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर श्रीगोंदा येथील सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात शुक्रवार ४ मार्च रोजी सहायक निबंधक अधिकारी अभिमान थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी भाऊसाहेब सिनारे प्रमुख उपस्थितीत सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी सर्व संचालक उपस्थित होते .या बैठकीमध्ये संस्थेच्या नूतन व्हा. चेअरमन निवडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला .यावेळी संस्थेचे संचालक रामदास दशरथ दांगडे यांचा एकमेव व्हा. चेअरमन पदासाठी अर्ज आल्याने रामदास दशरथ दांगडे यांची संस्थेच्या नूतन व्हा. चेअरमन पदाची घोषणा यावेळी सहायक निबंधक अधिकारी अभिमान थोरात व सहकार अधिकारी भाऊसाहेब सिनारे यांनी केली . या निवडीनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला .यावेळी सहायक निबंधक अधिकारी अभिमान थोरात व सहकार अधिकारी भाऊसाहेब सिनारे यांनी संस्थेचे नूतन अध्यक्ष रामदास दांगडे यांचा सन्मान करत सभासद व संस्थेचे हित जोपासण्यासाठी नूतन व्हा.चेअरमन रामदास दांगडे व संचालक मंडळाला शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना संस्थेचे नूतन व्हा.चेअरमन रामदास दांगडे यावेळी म्हणाले की सभासद व संस्थेचे हित जोपासण्यासाठी सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन संस्थेचा कारभार अधिक पारदर्शी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. संचालक मंडळाने जो माझ्यावरती विश्वास व्यक्त केला आहे.त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही .असे सांगून सर्व उपस्थित संचालक मंडळाचे नूतन व्हा. चेअरमन रामदास दांगडे यांनी आभार मानले या आयोजित बैठकीसाठी चेअरमन गोपीनाथ दांगडे, सचिव अनिल जगदाळे , माजी व्हाईस चेअरमन सतीश दांगडे ,
सर्व संचालक रवींद्र गलांडे ,शहाजी दांगडे, बाळू गलांडे, बाळकिसन कदम ,नानासाहेब पवार ,शांताराम दांगडे ,सविता दांगडे, सुनीता दांगडे, रावसाहेब ननवरे ,रोहिदास दांगडे, सुनील पवार ,सरपंच मिलिंद कदम, उपसरपंच रावसाहेब दांगडे ,माजी उपसरपंच कैलास दांगडे,त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते गौतम दांगडे, बाळासाहेब गलांडे ,भीमराव गलांडे, देविदास दांगडे , आप्पासाहेब पवार, दादासाहेब नारायण दांगडे ,तुषार पवार, सुधीर पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
