नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ डिसेंबरला शिव पाणंद शेतरस्त्यांसाठी पेरू वाटप आंदोलन ग्रामसमृद्धीसाठी शेत तिथे रस्ता द्या ~ शरद पवळे ( महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ डिसेंबरला शिव पाणंद शेतरस्त्यांसाठी पेरू वाटप आंदोलन
ग्रामसमृद्धीसाठी शेत तिथे रस्ता द्या ~ शरद पवळे ( महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते
प्रतिनिधी : सुदाम दरेकर / पारनेर :-
महाराष्ट्रात शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या असुन भावाभावात, शेतकऱ्यांमध्ये शेत रस्त्यांच्या कारणामुळेआपापसात मोठे वाद निर्माण झाले असुन भविष्यात निर्माण होणारा अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी केली असुन शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता मिळून देवुन शेवटच्या शेतकर्याला न्याय देण्यासाठी संघर्ष चालु असताना वेळोवेळी राज्यातील सत्ताधारी विपक्षांना शेतरस्त्यांसंबंधित शासननिर्णयासह हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करण्या संदर्भात निवेदने देवूनही न्याय न मिळाल्याने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने निवेदनाची दखल न घेतल्यास सोमावरी ११/१२/२०२४ जिल्हाधिकारी कार्यालयावर पेरू वाटप करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे व राज्यसमन्वयक दादासाहेब जंगले यांनी सांगितले
