पारनेरचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा मोठा निर्णय गाव तिथे कृत्ती समिति स्थापन करण्याचा निर्णय. पारनेर प्रतिनिधी / प्रतिक शेळके (सुपा) –
पारनेरचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा मोठा निर्णय
गाव तिथे कृत्ती समिति स्थापन करण्याचा निर्णय.
पारनेर प्रतिनिधी / प्रतिक शेळके (सुपा) –
पारनेर तालुक्यातील दुष्काळी गावांच्या पाण्याच्या प्रश्नावर विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी पारनेर तहसील कार्यालयावर संतोष वाडेकर, अशोक आंधळे, बाळशिराम पायमोडे यांनी आमरण उपोषण केले होते व त्यावेळी मिळालेल्या आश्वासनावर पुढील दिशा ठरवण्यासाठी सुपा येथील शासकीय विश्रामगृहावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी काळात पाण्याचा लढा तीव्र करण्यासाठी सर्वानुमते काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये तालुकाभर संपर्क अभियान राबविणे, गाव तिथे कृती समिती स्थापन करून या चळवळीत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना सामील होण्याचे आवाहन करून हजारो शेतकऱ्यांना एकत्र करून मार्च, एप्रिल महिन्यात जन आंदोलन करण्याचा सर्वांनुमाते निर्णय घेण्यात आला.
यावेळी बाळशिराम पायमोडे, जिल्हा संघटक संतोष वाबळे, सुभाष पाटील करंजुले, अविनाश देशमुख, तालुकाध्यक्ष मनोज तामखडे, तालुका सचिव अन्सार पटेल, रघुनाथ मांडगे, अरुण बेलकर, प्रवीण खोडदे, अनिल सोबले, एडव्होकेट सचिन कोकाटे, डॉक्टर विलास काळे, सुभाष शिंदे, अंकुश कोल्हे, सचिन बारवकर, राहुल गुंड, आनंदा सोनवने, संदीप साबळे, संजय भोर, रामदास साठे, चेअरमन संजय भोर, वसंत साठे, नंदन भोर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
