क्रिडा

निघोजला उपसरपंच चषक भव्य क्रिकेट स्पर्धा

निघोजला उपसरपंच चषक भव्य क्रिकेट स्पर्धा .

 प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर

:- निघोज ग्रामपंचायती चे उपसरपंच ज्ञानेश्वर ऊर्फ माऊलीशेठ वरखडे मित्र परिवार आयोजीत भव्य अंडर आर्म नाईट प्रिमिअर लिग ” उपसरपंच चषक ” क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दि . १३ ते रविवार दि . १५ या ३ दिवस संपन्न होणार असल्याची माहिती उपसरपंच ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली शेठ वरखडे मित्र परिवारा ने दिली आहे .
             उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे ५ वे वर्षे असून निघोज येथील वडनेर रोड वरील, वरखडे वस्ती मैदानावर या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत . प्रथम क्रमांक १५ , ५५५ रुपये , व्दितीय क्रमांक १३ , ३३३ रुपये , तृतीय क्रमांक ११ ,१११ रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत , तर मैदान , सन्मान चिन्ह , दादा फायटर्स , बॉल / स्टम्प , बॅट , सरपंच इलेव्हन अळकुटी , शिवबा फायटर्स , सरपंच सचिन वराळ , शिव शंभो वॉरिअर्स , जाहिरात यासाठी विविध दानशूर व्यक्तींनी सौजन्य दिले आहे .
      तर शनिवार दि . १५ रोजी ८ वाजता या स्पर्धेचे खास आकर्षण असलेल्या सायली पाटील यांचा जल्लोष म्युझिकल ऑर्केस्ट्रा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!