राजापूर येथे धाडसी चोरी मंदिरामधील चांदीच्या पादुका चोरीला
राजापूर येथे धाडसी चोरी मंदिरामधील चांदीच्या पादुका चोरीला
श्रीगोंदा प्रतिनीधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथे राजापूर नंबर एक या गावांमध्ये संत गोविंद बाबा महाराज यांच्या मंदिरामध्ये चांदीच्या पादुकांची चोरी २० एप्रिल रोजी रात्री झाली. राजापूर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान संत गोविंद बाबा यांची राजापुर येथे संजीवनी समाधी आहे . व या ठिकाणी त्यांचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये संत गोविंद बाबा महाराज यांच्या चांदीच्या पादुका अंदाजे किंमत ५० हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी चोरून नेले आहेत .नेहमीप्रमाणे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी ग्रामस्त गेले आसता त्यांच्या निदर्शनास आले मंदिरामध्ये चांदीच्या पादुका नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ही घटना त्यांनी ग्रामस्थांना कळवली त्यानंतर घटनास्थळी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भांडरे यांच्या आदेशाने साह्यक फौजदार मारुती कोळपे , बर्डे साहेब , पो.काँ जाधव मॅडम यांनी घटना स्थळी जाऊन परिसराची पाहणी करून पंचनामा केला . मंदिराचे पुजारी यांच्या कुटुंबामध्ये आळंदी येथे लग्न आसल्यामुळे त्यांनी आद्यपार्यंत फिर्याद दिली नाही आसे समजत आहे .
- नागरिकांमध्ये च संभ्रम
मंदिरामधे चांदीच्या पादुका कोणी म्हणतय काल नव्हत्या कोणी म्हणतय सकळी होत्या त्यामुळे पोलीसांना तपास करताना कसरत करावा लागत आहे .
ग्रामस्तांच्या भावना लक्षात घेऊन पोलीसांनी लवकारात लवकर तपासाचे सुत्र जलद गतीने फिरवुन चोरट्यांना मुद्देमाल सह अटक करावी – मा. उपसरपंच सचिन चौधरी .
