महानगर बँकेच्या निवडणुकीत विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकल्यामुळे आमच्यावर टीका . सुमनताई शेळके .
महानगर बँकेच्या निवडणुकीत विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकल्यामुळे आमच्यावर टीका .
सुमनताई शेळके .
मुंबई :- प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
जी एस महानगर बँकेच्या निवडणूकीत विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकल्यामुळे आमच्यावर टिका केली जात असून खोटी माहिती पसरवून मतं मिळविण्याचा केविलवणा प्रयत्न केला जात आहे , भविष्यात हे असेच सुरू राहिले , तर बँक डबघाईला आल्याशिवाय राहणार नाही , आज उमेदवार निवडण्याचा प्रश्न च नाही , तर बँकेसाठी सत्य की असत्य , मुल्य की अमुल्य , स्वार्थ की निस्वार्थ , शिष्टाचार की भ्रष्टाचार यामधला निर्णय घेण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया सॉलिसिटर गुलाबराव शेळके व सुमनताई शेळके पॅनलच्या प्रमुख सुमनताई शेळके यांनी दिली आहे .
जी एस महानगर बँक संचालक मंडळाच्या पंच वार्षिक निवडणूकी च्या अखेरच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांना उधाण आले असून विरोधकांनी केलेल्या आरोपांना सुमनताई शेळके उत्तर देताना पुढे म्हणाल्या की , एकीकडे गुलाबराव शेळके आणि उदय दादा यांच्या प्रामाणिक विचारांना मी पन्नास वर्षे साथ देऊन संसार चालविला आणि त्याचबरोबर संस्कार बरोबर सांभाळ केला . त्यांची स्वप्न त्यांची निती मुल्यं जोपासली आणि बँकेची दैदिप्यमान प्रगती केली . प्रामाणिक विचारांचा वारसा पुढे नेला , तर दुसरीकडे गोंधळलेले खोटे बातमी पसरणारे साहेबांच्या विरोधात कारवाई करणारे एकत्रित येऊन बँक विशिष्ट हेतूने प्राप्तीसाठी काही ही करण्यास तयार असलेली मंडळी बँकेची सत्ता ताब्यात घेऊ पाहतात .यापैकी कोणाच्या हाती बँकेचे सूत्र जायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे . प्रामाणिक विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या माझ्यासारख्या निस्वार्थी व्यक्तींच्या हाती की , स्वार्थासाठी बँकेत सत्तेवर येऊ पाहणाऱ्या स्वार्थी लोकांच्या हाती .तर एक समर्थ जबाबदार आणि लोकाभिमुख नेतृत्व व माझ्याकडे सामाजिक कार्याचा अनुभव आहे . बँकेसाठी काम करण्याची तळमळ आहे , तसा माझा दृष्टिकोन आहे आणि निस्वार्थी शक्ती आहे . बँक आज विचारांवर उभी आहे , त्याच विचारावर अबाधित राहण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला आहे , म्हणून बँकेच्या सर्व सभासदांना मी मनापासून विनंती करते की , बँकेच्या उज्वल भविष्यासाठी संस्थापक अध्यक्ष गुलाबराव शेळके साहेब व श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके या आमच्या पॅनल च्या सर्व उमेदवारांना बँकेच्या उज्वल भविष्यासाठी निवडून द्या आणि ५० वर्षे बँकेच्या विजयाची परंपरा अखंडित ठेवा , हीच गुलाबराव शेळके व ॲड . उदय शेळके यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासारखे होय .
माझे बँकेसाठी भविष्यातील उद्दिष्टे बँकेला भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च नियंत्रित करणारे भारतीय रिझर्व बँकेची उत्कृष्ट व्यवस्थापन प्रमाणपत्र प्राप्ती अजून शेकडा २ टक्के एनपीए , ३ हजार कोटी ठेवी , ७० शाखांचा विस्तार , १ टक्का नेट एनपीए रेषो , ५ हजार कोटी ठेवी संकलन , १०० शाखांचा विस्तार , बँकेचे मुख्य कार्यालयाचे जीएसएम महानगर भवनात स्थलांतर , बँक ऑनलाईन बँकिंग , व्हाट्सअप बँकिंग , ऑनलाईन केवायसी , व्हिडिओ प्रणाली आणि नफ्यात दुप्पट वाढ करून बँके चा नावलौकिक वाढवू . बँकेची बदनामी करणे योग्य नाही . बँकेसाठी आमचे ग्राहक , खातेदार , सभासद हे देवासारखे आहेत . आज बँकेचे ८० हजार सभासद ३ हजार कोटी ठेवी व ७० शाखा विस्तारापर्यंत पोहोचली आहेत . ही केवळ आमच्या खातेदार ग्राहक , ठेवीदार यांनी दाखविलेल्या विश्वासा मुळे आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे जर खातेदार , सभासद , कर्मचारी यांना तुसडेपणाची वागणूक दिली असती , तर बँकेची प्रगती झाली असते का ? हा माझा विरोधकांना सवाल आहे . चुकीची माहिती पसरवून बँकेची बदनामी करणे योग्य नाही . माझी तर नम्र विनंती आहे की , माझ्यावर किंवा माझी मुलगी स्मिता गुलाबराव शेळके यांच्यावर सभासद व कर्मचारी विषय खोटे आणि गंभीर करण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्यावी .
ही गोष्ट अत्यंत विडंबनात्मक आणि विचार करायला लावणारी आहे की , जे लोक बँकेवर आरोप करत आहेत . त्याच लोकांपैकी अनेक जण बँकेच्या संचालक मंडळात होते . ते सत्तेवर असताना , तेव्हा ते का काही बोलले नाही , कारण बोलण्यासारखे काही च नव्हते . आजही तसे काही च ठोस कारण त्यांच्या हातात नाही . हे आरोप सत्यासाठी नाहीत , तर केवळ राजकारणासाठी च आहे . आमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं करता न आल्यामुळे ते खोट्या गोष्टी पसरून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे .
आईच्या पदराआड लपून घुसखोरी केल्याचा आरोप – स्मिता गुलाबराव शेळके .
माझा भाऊ ॲड . उदय दादा च्या निधनानंतर गेल्या अडीच वर्षापासून माझ्यावर खोटे आरोप करून केले जातात . आईच्या पदराआडून मागे लपणे , व घुसखोर असे संबोधन केले जाते . याचे कारण मला समजले नाही . पण मी वडील व भावाच्या निधनानंत आईची सेवा रूपी काळजी घेते . माझ्यावर अत्यंत चुकीचा व खालच्या पातळीवर आरोप करण्यात आले आहेत .
मी एक सरळ व निष्कलंक वडिलांची मुलगी आहे . माझ्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य सत्याच्या मार्गाने घालविले आहे . त्याच आदर्शा वरून ॲड . उदय दादांनी काम केले , मी ही त्याच आदर्शावर काम करत आहे .
माझ्यावर माझी भाची प्रियांका शेळके हिला महानगर बँकेची सभासद होण्यापासून रोखल्याचा आरोप केला जात आहे . हा आरोप पुर्णत : चुकीचा आहे , कारण तिला बँकेची १४ मार्च २०२४ रोजी सभासद करण्यात आले आहे . ]
विरोधकांनी बँकेच्या निवडणूकीत आम्हांला जाणीव पूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला , असे सुमनताई शेळके बोलताना पुढे म्हणाल्या की , निवडणूक जाहीर झाल्यावर ८ संचालक फोडले , अर्ज दाखल केल्यावर आमचे उमेदवार फोडले , एकाला दम देऊन अर्ज मागे घ्यायला लावला , उमेदवार जाहीर झाल्यावर पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला , वैयक्तीक आरोप करण्यात आल्यामुळे बँकेची ही बदनामी झाली , निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी अव्यवहार्य प्रस्ताव दिले .
माझा मुलगा ॲड . उदय याचे अकाली निधन झाल्यानंतर मला माझे राहते घर सोडून मी गेली अडीच वर्षे वेगळी राहतेय , पती गुलाबराव शेळके व मुलगा उदय यांच्या विराहा ने माझ्या वाट्याला आलेल्या वेदना , झालेला मानसिक ताण , त्यांनी अत्यंत कष्टाने उभी केलेल्या या बँकेचे फोडलेल्या संचालक मंडळातून माझे नातेवाईक ऐनवेळी निघून गेल्याने मला खूप वेदना झाल्या , असे सुमन ताई शेळके म्हणाल्या .
