भारतीय बौद्ध महासभा पारनेर शाखा कार्यकारणी पुनर्गठन संपन्न तालुका अध्यक्ष गिरीश गायकवाड, सरचिटणीस संपत पवार तर कोषाध्यक्ष दिलीप सोनवणे
भारतीय बौद्ध महासभा पारनेर शाखा कार्यकारणी पुनर्गठन संपन्न
तालुका अध्यक्ष आद. गिरीश गायकवाड, सरचिटणीस आद. संपत पवार तर कोषाध्यक्ष आद. दिलीप सोनवणे
पारनेर –
भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर दक्षिण विभाग अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा पारनेर शाखेचे पुनर्गठन 9 मार्च 2025 रोजी तालुक्याचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान जिल्हा संघटक आद. बाबाजी वाघमारे यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा दक्षिण विभाग जिल्हा अध्यक्ष आद. राजेंद्र साळवे, सरचिटणीस आद. सतीश ओहोळ सर, जिल्हा कोषाध्यक्ष आद. विजय हुसळे सर, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आद. भगवंत गायकवाड सर, जिल्हा संस्कार सचिव आद. रेवणनाथ साळवे, जिल्हा कार्यालयीन सचिव आद. वीरेंद्र पवार सर, जिल्हा हिशोब तपासनिस आद. संतोष कांबळे, कायदेशीर सल्लागार आद. राहुल कांबळे सर, जिल्हा महिला कोषाध्यक्ष शुभांगी ताई पवार व जिल्हा संघटक पारनेर विभाग आद. बाबाजी वाघमारे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचा हस्ते आदर्शांचे पूजन व वंदना सुत्तपठण करून करण्यात आले.
प्रथम सत्रामध्ये अध्यक्ष बाबाजी वाघमारे व सरचिटणीस यांनी मागील वर्षाचा कार्य अहवाल व आर्थिक अहवाल सर्वांचा समोर विषद केला.
उपस्थित सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी संस्थेचा कार्याबद्दल व भेटणाऱ्या पदा बद्दल महत्व विशद केले.
दुसऱ्या सत्रामध्ये जिल्हा कमिटी च्या मार्गदर्शना खाली जुने व काही नवीन सभासद घेऊन पारनेर शाखेचे पुनर्गठन करण्यात आले.
जिल्हा अध्यक्ष आद . राजेंद्र साळवे साहेब व जिल्हा निवड कमिटी ने पारनेर तालुका शाखा कार्यकारिणीची निवड केली.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अध्यक्ष पदी आद. गिरीश धोंडिबा गायकवाड, सरचिटणीस आद.संपत जयराम पवार, कोषाध्यक्ष आद. दिलीप अर्जुन सोनवणे, तर संस्कार उपाध्यक्ष पदी आद. राहुल कोंडीबा सोनावणे, उपाध्यक्ष संरक्षण आद. दत्तात्रय सखाराम भोबळ, उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन आद. रमेश लक्ष्मण गायकवाड, संस्कार सचिव पदी आद. सुभाष सतू सोनवणे व आद. संघराज बळीराम सोनवणे, संरक्षण सचिव पदी आद. स्वप्नील कैलास गायकवाड व आद. सुभाष वसंत गायकवाड, सचिव प्रचार व पर्यटन पदी आद.राहुल विठ्ठल मोरे व आद.चंद्रकांत भैय्याजी गायकवाड तर संघटक म्हणून आद. नितीन मोहन साळवे, आद. सीताराम नाना लवांडे,भागाराम तावजी साळवे, आद. मयूर मछिद्र नगरे, बाळासाहेब मकाजी रोकडे, आद. सुनील राजाराम शिंदे, आद. गौतम एकनाथ शिंदे, आद. अमोल बाजीराव जाधव , कार्यालयीन सचिव जयवंत गंगाराम सोनवणे तर हिशोब तपासनीस आद. सुखदेव भास्कर थोरात यांची निवड करण्यात आली. निवड खेळी मेळी च्या वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुक्याचे माजी सरचिटणीस आद. गिरीश गायकवाड यांनी केले. तर
कार्यक्रमाचे आभार बौद्धचार्य आद. रमेश गायकवाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
