ओंकार शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
ओंकार शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
ओंकार शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ढवळगाव देवदैठण, युनिट नंबर ७ येथे ७९ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा समारंभ ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन माननीय श्री. बाबुराव बोत्रेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार शुगर ग्रुपचे संचालिका माननीय सौ. रेखाताई बाबुराव बोत्रेपाटील, डायरेक्टर माननीय श्री. अतुल जाधव साहेब तसेच राजापूरचे माजी सरपंच माननीय श्री. सचिन दादा चौधरीसाहेब. कारखान्याचे जनरल मॅनेजर माननीय श्री. स्वप्निल गावडे साहेब यांच्या शुभहस्ते व एच आर मॅनेजर मा. श्री. रोहित बनकर, चीफ इंजिनियर मा. श्री. दत्तात्रय तावरे, चीफ केमिस्ट मा. श्री. गोपिनाथ पवार, चीफ अकाऊंटन्ट मा. श्री. सुनील राऊत, शेतकी अधिकारी मा. श्री. सुनिल साठे, सिव्हील सुपरवायझर मा. श्री. अनील बनकर, ईडीपी मॅनेजर मा. श्री. मनिषकुमार मोरे, स्टोअर किपर मा. श्री. गेनबा कदम, माननीय श्री. प्रवीण कवाष्टे, माननीय श्री. दिपक कवष्टे, इतर सन्माननीय सदस्य, सर्व अधिकारी,कर्मचारी व कामगार वर्ग आणि शेतकरी वर्ग, तोडणी वाहतूकदार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ओंकार ग्रुपच्या संचालिका माननीय सौ रेखाताई बाबुराव बोत्रे पाटील यांनी उपस्थितांना 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिव्हिल सुपरवायझर श्री अनिल बनकर यांनी केले.
