2025 ची मकर संक्रांत व संक्रांतीचा पुन्यकाल आशा प्रकारे राहणार
2025 ची मकर संक्रांत व संक्रांतीचा पुन्यकाल आशा प्रकारे राहणार
श्रीगोंदा प्रतिनिधी –
संक्रांतीचा पुन्यकाल – मंगळवार दिं – १४ जानेवारी २०२५ रोजी
सकाळी ८/५५ ते दुपारी ४/५५ पर्यंत आहे.
या दिवसाचे कर्तव्य – तिलमिश्रीत उदकाने स्नान ‘तिळाचे उटणे अंगास लावणे तिलहोम तिलतर्पण तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो.
शके १९४६पौष कृ.१ मंगळवार १४ जानेवारी२०२५ रोजी सकाळी ८/५५वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.
बालव करणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले.
वाहनादी प्रकार याप्रमाणे – वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फुल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे सर्प जाति असून भूषनार्थ मोती धारण केलेले आहे.वारनां नाक्षत्रनांव मदोदरी असून सामुदाय मुहुर्त ४५ आहेत पुर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायेव्य दिशेस पाहत आहे संक्रातिच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष -गवत कापणे व तोडणे गाई म्हंशीची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करु नयेत. संक्रांतीच्या पर्वकाळात स्रियांनी करावयाची दाणे – नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमि गाय वस्र घोडा इत्यादि यथाशक्ती दाने करावीत.
टीप –
दरवर्षी मकरसंक्रात अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये हि मकर संक्रांत सर्वांना शुभदायी आनंदी वातावरणात जावो सर्वांना शुभेच्छा.
श्री.संजुकाका पोपट कुलकर्णी मु.पो .येळपणे , ता -श्रीगोंदा जि- अहील्यानगर
संपर्क – ९८५०२६२३६८
