बांधकाम विभाग पारनेर यांच्या पत्रानंतर मनसे नेते रविश रासकर यांचे उपोषण तात्पुरते स्थगित
मिंडा कंपनी ते बाबुर्डी रस्त्याचे काम करण्यास बांधकाम विभाग यांनी मागितली वेळ
बांधकाम विभाग पारनेर यांच्या पत्रानंतर मनसे नेते रविश रासकर यांचे उपोषण तात्पुरते स्थगित
पारनेर प्रतिनिधी – प्रतिक शेळके
मिंडा कंपनी ते बाबुडी रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले होते. त्यानंतर इस्टिमेट नुसार रविश रासकर यांनी रस्त्याचे काम हे अतिशय खराब झाले असल्याने एमआयडीसी चौक म्हसने फाटा फेज २ एमआयडीसी चौकात उपोषणास बसणार होते.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग पारनेर यांनी मनसे नेते रविश रासकर यांना उपोषणापासून परावृत्त व्हावे असे पत्र दिले. त्या पत्रात सार्वजनिक बांधकाम उपविभाग पारनेर यांनी रस्त्याचे काम करण्यास थोडी मुदत मागितली असल्याकारणाने सोमवार दि १३/०१/२०२५ रोजीचे उपोषण मनसे नेते रविश रासकर यांनी तात्पुरते स्थगित केले आहे. जर हे रस्त्याचे काम इस्टिमेट नुसार ३० दिवसात झाले नाही तर रविश रासकर सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर येथे उपोषण किंवा आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला. हे निवेदन उपविभागीय अभियंता पारनेर वसईकर साहेब यांना देन्यात आले.
