महिला दिनानिमित्त अळकुटीत महिलांचा झाला मोठा सन्मान , महिलाही भारावल्या .
महिला दिनानिमित्त अळकुटीत महिलांचा झाला मोठा सन्मान , महिलाही भारावल्या .
अळकुटी :- प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
अळकुटी च्या अभ्यासू सरपंच डॉ . कोमल भंडारी यांनी महिल दिनाचे औचित्य साधत महिलांना भव्य मेळाव्या व्दारे एकत्र आणत अळकुटी परिसरातील महिलांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान केल्याने महिला ही भारावून गेल्या .
पारनेर तालुक्याच्या इतिहासात अळकुटी सारख्या ग्रामीण भागात महिला सरपंचांनी महिला दिनाचे औचित्य साधत शेतकरी , कष्टकरी , कामकरी , व्यावसायिक , नोकरदार महिलांना मोठ्या संख्येने एकत्रित आणत भव्य महिला मेळाव्याच्या निमित्ताने महिला ही सहभागी झाल्याने अळकुटी परिसर महिलामय झाल्याचे दिसून आले .
यावेळी सरपंच डॉ . कोमल भंडारी यांच्या वतीने अळकुटी परिसरातील डॉ . सरिता खोसे , डॉ . रेश्मा गुंड या दोघींना वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुण गौरव पुरस्कार , तर अंजनाबाई शिरोळे , कमलबाई हांडे , कांताबाई शिंदे , इंदूबाई जाधव , हिराबाई शिरोळे ,रंजना परंडवाल , कांताबाई परंडवाल , मीराबाई शिंदे , मीनाताई भंडारी , इंदुबाई भंडारी , सुनीता बेलकर , हिराबाई पुंडे , मुमताज पटेल अलकाबाई साखला , वंदना पोखरकर , लंकाबाई घोलप या महिलांना शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . या महिला मेळाव्याला अळकुटी ग्रामपंचायत सदस्या लताबाई घोलप , सारिका शिरोळे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हा महिला मेळावा आयोजित करून सरपंच डॉ . कोमल भंडारी यांनी महिलांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांच्या चाकोरी बद्द जीवनातून सन्मान पुर्वक समाजापुढे आणल्याने व त्यातल्या त्यात काही महिला तर प्रथमच महिला मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांत मोठ्या महिलांच्या गर्दीत व ते ही व्यासपीठावर उपस्थित झाल्याने या सन्मान मूर्ती महिला अक्षरशः भारावल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले .
तालुका वा जिल्हा पातळीवर नेते व अधिकारी महिलांना विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्रित आणतात , पण तेथे ही महिलांची संख्या मोजकीच असते . अळकुटी सारख्या पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील महिला सरपंच डॉ . कोमल भंडारी यांनी मनाचा मोठे पणा दाखवत अति प्रचंड महिला मेळाव्याच्या निमित्ताने महिलांचा सन्मान घडवून आणल्याने पारनेर तालुक्यातील इतिहासाला या महिला मेळाव्याचे आदराने नक्कीच नोंद घ्यावी लागेल
