अज्ञात वाहनाचा धक्का लागून व्यक्तीचा मृत्यू नगर पुणे हायवेवरील बेलवंडी फाटा येथील घटना
अज्ञात वाहनाचा धक्का लागून व्यक्तीचा मृत्यू नगर पुणे हायवेवरील बेलवंडी फाटा येथील घटना
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील नगर पुणे हायवे वरील बेलवंडी फाटा येथे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला शरद भाऊसाहेब आरसुळे राहणार मु.पो.तामसवाडी ता.नेवासा जि.अहिल्यानगर वय – ३५ वर्षे हे रसत्याच्या कडेने चालले असता अज्ञात वाहनाचा धक्का लागून त्यांच्या अंगावरून गाडीचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. बेलवंडी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असता बेलवंडी पोलीस स्टेशनचे घटनास्थळी येऊन सदरील मृत्यूदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये शवविच्छेदनासाठी घेऊन गेले असून पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस करीत आहेत. मयत शरद भाऊसाहेब आरसुळे हे रांजणगाव एमआयडीसी मध्ये फियाट कंपनीच्या कामगार बसच्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करत होते .
