म्हसने येथे शुक्रवारी काळभैरवनाथ यात्रोत्सव, शनिवारी कुस्त्यांचे मैदान
प्रतिनिधी :- प्रतिक शेळके / सुपा
पारनेर तालुक्यातील म्हसने सुलतानपूर येथे काळभैरवनाथ यात्रोत्सव शुक्रवारी (18 एप्रिल) रोजी साजरा होत आहे. तसेच शनिवारी (19 एप्रिल) दुपारी 3 वाजेपासून नामांकित मल्लांच्या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त सायंकाळी छबिना मिरवणूक व रात्री मनोरंजनासाठी संध्या माने सोबत रोहन माने सोलापूरकर लोकनाट्य तमाशा आयोजित होणार आहे.
शनिवारी (दि 19) दुपारी 3 वाजेपासून कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार आहे. ग्रामस्थ लोकवर्गणी जमा करून या कुस्तीपटूवर बक्षिसाचा वर्षाव करत कुस्ती मल्लविद्येला प्रोत्साहन देत असतात. या कुस्ती मैदानाचा कुस्ती शौकिनांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
