पळवे खुर्द येथील श्री काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची जल्लोषात सांगता
पळवे खुर्द येथील श्री काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची जल्लोषात सांगता
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
ह भ प प पू. वै. रामदास महाराज साबळे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच पळवे खुर्द चे भूषण ह भ प सोमनाथ महाराज बारगळ (सर ) यांच्या मार्गदर्शनाने तसेच सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह भ प शिवानंद महाराज नांगरे यांच्या प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ पळवे खुर्द पळवे बुद्रुक यांच्या सहकार्याने श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हे सप्ताहाचे 13 वे वर्ष होते. हा अखंड हरिनाम सप्ताह रविवार दिनांक 17 रोजी सुरू झाला होता. रविवार दि. 17 रोजी ह भ प सोमनाथ महाराज बारगळ ( सर ), सोमवार दि. 18 रोजी दीपक महाराज मेटे ( भागवताचार्य अंबाजोगाई ), दि. 19 रोजी ह भ प उद्धव महाराज चोले ( रामानाचार्य खडकी बीड ) बुधवार दि. 21 ह भ प गोविंद महाराज गोरे ( विनोदाचार्य आळंदी देवाची ) शुक्रवार दि. 22 ह भ प सुदर्शन महाराज शास्त्री ( कारखेले, भगवानगड ) शनिवार दि.23 ह भ प अनिल महाराज तुपे ( नाशिक) दहा ते बारा वाजता नाथा जन्माचे कीर्तन झाले.रविवार दि. 24 रोजी ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर ( शास्त्री जळगाव ) यांच्या कार्याच्या कीर्तनाने सांगता झाली.यामध्ये प्रामुख्याने पहाटे चार ते सहा काकडा आरती, सकाळी आठ ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते 12 गाथा भजन, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, सायंकाळी सात ते नऊ, हरी किर्तन, सायंकाळी नऊ नंतर हरिजागर व भजन असे दैनंदिन कार्यक्रम झाले. तसेच या ठिकाणी विना पहारा, चोपदार पहारा,आलेल्या सर्व महाराजांची राहण्याची व्यवस्था तसेच मंडप व्यवस्था पार्किंग व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. तसेच पळवे खुर्द वतीने तसेच गीताई महिला समूह यांच्या वतीने महाप्रसादाचे अन्नदानही झाले रविवार दिनांक 24 रोजी विक्रांत देशमुख, भाग्येश देशमुख, जितेंद्र देशमुख, विनायक देशमुख, गोरख गाडीलकर मेजर, बबनराव देशमुख, गोरख देशमुख, नानासाहेब देशमुख,पोपट देशमुख, सचिन देशमुख, रावसाहेब शेळके, बाबासाहेब शेळके मेजर, रमेश शेळके ( एसटी ), वसंत रणदिवे, दिलीप गाडीलकर, दौलत कुटे, दत्तू धों.तरटे यांचे महाराजांचे योगदान व काल्याच्या महाप्रसादाचे अन्नदान झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब शेळके (सर )यांनी केले..
