पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघावर अटी तटी च्या लढतीत काशिनाथ दातेंचे वर्चस्व
पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघावर अटी तटी च्या लढतीत काशिनाथ दातेंचे वर्चस्व .
पारनेर :- प्रतिनिधी :- सुदाम दरेकर
पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत महायुती चे उमेदवार काशिनाथ दाते हे महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्यावर २४०६ मतांनी अतिशय अटी तटीच्या लढतीत विजयी झाले आहेत .
पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी च्या निकालात काही फेऱ्यांचा अपवाद वगळता महायुतीचे काशिनाथ दाते सर १ ल्या फेरीपासून सातत्याने आघाडीवर होते , त्यामुळे पारनेर तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते अक्षरशः बुचकळयात पडत होते . क्षणा क्षणाला उत्कंठा शिगेला पोहोचत होती . बऱ्याच वेळा मतमोजणीत काशिनाथ दाते पुढे जात होते , तर राणी लंके कधी थोड्या फार मतांनी पुढे जात . सोशल मीडिया वर निकालाची चर्चा सुरू होती . पण निकाल १ ते दोन हजारांच्या आसपास रेंगाळत होता . अखेर २४ व्या फेरीच्या अखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांना २४०६ मतांनी विजयी घोषीत केले , अन कार्यकर्त्यां चा उत्साह संचारला , डी जे चा दणदणाट , गुलांलाची उधळण व घोषणां च्या आवाजात विजय साजरा करण्यात आला . महाविकास आघाडी च्या उमेदवार राणी लंके यांना १ लाख १० हजार ३६९ , अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांना १० हजार ६४५ , अपक्ष व दातें ना पाठिंबा दिलेले विजय औटी ८५८ , माजी आमदार व अपक्ष विजय औटी २ हजार ४६४ तर अपक्ष सखाराम सरक यांना ३ हजार ५७२ मते मिळाली .
नगर जिल्ह्यातील पारनेर व शेवगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत सर्वांत जास्त २७ बुथ असल्याने मतमोजणी ला वेळ लागणार , हे माहित असूनही कार्यकर्ते मतमोजणी केंद्रात ठाण मांडून बसले होते . अतिशय रटाळ व वेळ खावू प्रक्रिया राबविली गेली .
एका घरात दोन पदे व इतर कारणांनी ही निवडणूक गाजली .
निवडणूक निर्णय अधिकारी चिंचकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी , तहसिलदार गायत्री सौंदाणे यांनी ही निवडणूक मतमोजणी प्रक्रिया अतिशय बंदिस्त व कमी जागेत ठेवली होती . उमेदवाऱ्यांच्या प्रतिनिधीं ना बसण्यास ही जागा उपलब्ध नव्हती . त्यामुळे ते कंटाळून बाहेर येत होते . तर पत्रकारांसाठी मिडीया सेंटर मतमोजणी केंद्रापासून बाजूला ठेवले होते . केंद्रात ही जाण्यास पत्रकारां ना प्रवेश ही नव्हता . अखेर ध्वनी क्षेपकांवर जाहीर होणारी निकालाची घोषणा ऐकून त्याची नोंद घ्यावी लागत असे . ]
लाडकी बहीण , एका घरात दोन पदे व इतर कारणांनी ही निवडणूक गाजली .
